Student's Tractor Accident in Amravati : काळजाचा ठोका चुकवणारा अपघात अमरावतीत झाला. शिबीर आटोपून विद्यार्थी ट्रॅक्टरने चालले होते.  (Tractor Accident ) त्यावेळी या वळणावर ट्रॅक्टरची ट्रॉली उलटली आणि 22 विद्यार्थी गंभीर जखमी झालेत. (Amravati Accident ) जैनापूर इथं जे डी पाटील सांगळदकर कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराचं आयोजन केलं होते. श्रमसंस्कार शिबीर आटोपून विद्यार्थी ट्रॅक्टरमधून दर्यापूरला जात होते. वळणावर ट्रॅक्टर चालकाचं नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर उलटला. (Tractor Accident in Amravati ) या अपघातात 22 जण जखमी झालेत. त्यातील दोन विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धक्कादायकबाब म्हणजे चक्क ट्रॅक्टरमधून विद्यार्थ्यांची ने-आण करण्यात आली. ट्रॅक्टरच्या ट्रोलीत खचाखच विद्यार्थी भरण्यात आले होते. दरम्यान, विद्यार्थी ट्रॅक्टरमध्ये असतानाही ट्रॅक्टर चालक वेगाने चालला होता. वळण असतानाही ट्रॅक्टरचा वेग कमी केला नाही. त्यामुळे ट्रॅक्टरची ट्रॉली उलटली आणि विद्यार्थी जखमी झालेत. या निष्काळजीपणा कोण जबाबदार, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांचे शिबीर भरविण्यात आले होते. मग विद्यार्थ्यांनीची जबाबदारी कोण घेणार,अशी संतप्त प्रतिक्रिया पालक आणि नागरिकांतून विचारण्यात येत आहे.


या अपघाताची माहिती मिळतात विद्यार्थ्यांचे नातेवाईक आणि त्यांचे पालक यांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. त्यामुळे रुग्णलायात मोठ्या संख्येने गर्दी झाली. काही काळ रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झालेले होते. घटनास्थळी दर्यापूर पोलीस दाखल झाले असून गर्दी पांगवण्याचा प्रयत्न पोलिसांच्यावतीने करण्यात आला. दरम्यान, महाविद्यालायने विद्यार्थ्यांच्या जीवाशी हा खेळ केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. महाविद्यालयाच्या निष्क्रिय कारभाराचा नातेवाईकांकडून जाहीर निषेध करण्यात येत आहे. महाविद्यालयाकडून अशा निष्क्रिय कारभाराची चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे.


 



या ट्रॅक्टरच्या अपघाताचा व्हिडिओ आता समोर आला असून मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. छोट्या वळण रस्त्यावर हा ट्रॅक्टर वेगाने जात असताना ट्रॅक्टरला अपघात झाला. या अपघातात 22 विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून या अपघातातील दोन विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.