Amravati Crime News : मूल होत नाही म्हणून भोंदू बाबाकडे गेलेल्या एका महिलेचे आयुष्य उद्धवस्त झाले आहे. या बाबाच्या दरबारात भलतेच प्रकार सुरु होते. ही महिल देखील या जाळ्यात अडली. या महिलेवर भोंदू बाबानेच लैंगिक अत्याचार केला आहे. अमरावती येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी या भोंदू बाबाला अटक केली आहे. 


भोंदू बाबाला अटक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमरावती जिल्ह्यतील दर्यापूर येथे ही घटना घडली आहे. या ढोंगी बाबा विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिलेवर बळजबरीने बलात्कार केल्या प्रकरणी या भोंदू बाबाला अटक पोलिसांनी अटक केली आहे. 


पौर्णिमेच्या रात्री भरायचा दरबार


प्रत्येक पौर्णिमेला कुकसा या गावात हा भोंदू दरबार भरवायचा.  ज्यांना मूल बाळ होत नही असे अनेक जण या बाबाच्या दरबारात यायचे. मात्र, या भाविकांचा गैरफायदा घेत या भोंदू बाबाने एका महिलेचा बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. फरार ढोंगी बाबाला अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहे. दरम्यान ,दर्यापूर तालुक्यातील कुकसा गावात उपविभागीय अधिकारी व पोलीस प्रशासन दाखल झाले आहेत. संतोष बावणे असे अटक झालेल्या या भोंदू बाबांचे नाव आहे. बलात्काराच्या गुन्ह्यासह या भोंदू बाबा विरोधात जादूटोणा कायद्या अंर्तगत देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


भोंदूबाबाच्या अघोरी विद्येतून तरुणाचा मृत्यू


भोंदूबाबाच्या अघोरी विद्येतून तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप मृत तरुणाच्या कुटुंबीयांनी केला होता. नाशिकमधल्या सटाण्यात हा प्रकार घडला होता.  तरुण आजारी असल्यामुळे भोदू बाबाकडे उपचारसाठी गेला होता. भरपूर दिवस झाले तरुण घरी परत आला नाही. बाबाकडे विचारणा केली असता उडावाउडवीचे उत्तर दिली. कुटुबियांनी तरुणाचा शोधा घेतला. यावेळी त्याचा मृतदेह बाबाच्या घरात कुजलेल्या अवस्थेत सापडला. दरम्यान भोंदूबाबा आणि साथीदार फरार झाला. 


गरम तव्यावर बसून भक्तांना शिव्या देणारा बाबा


अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील मार्डी येथील भोंदू बाबा तप्त तव्यावर बसून भक्तांना शिवीगाळ करतो. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. श्री संत सच्चिदानंद गुरुदास महाराज असं या बाबाचं नाव आहे.