पाणी टंचाईवरुन झालेल्या राडा प्रकरणात या आमदाराला 3 महिन्यांची कारावासाची शिक्षा
पाणी टंचाई सभेत झाला होता राडा.
अमरावती : अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांना न्यायालयाने तीन महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सोबतच त्यांना 15 हजारांचा दंड ही ठोठावला आहे. देवेंद्र भुयार जिल्हा परिषद सदस्य असताना 2019 मध्ये जिल्हा परिषदेच्या पाणी टंचाई सभेत वरूडच्या गटविकास अधिकारी यांच्या दिशेने माईक आणि पाणी बॉटल फेकून मारणे भोवले आहे.
तत्कालीन जिल्हा परिषदेच्या सीओ मनीषा खत्री यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. अमरावती जिल्हा आणि सत्र न्यायालयाने आमदार देवेंद्र भुयार यांना शिक्षा सुनावली आहे.
वरूडच्या तहसील कार्यालयात तहसीलदारांना शिवीगाळ, मारण्याची धमकी आणि माईक फेकून मारल्याचा आरोप त्यांच्यावर होता. या प्रकरणात आमदार देवेंद्र भुयार (MLA Devendra Bhuyar) यांना स्थानिक न्यायालयाने 3 महिन्यांची कारावासाची शिक्षा सुनावलीये. हे प्रकरण 2013 मधील आहे. जेव्हा ते आमदार नव्हते.