मुंबई : नवनीत राणा-कौर (Navneet Rana-Kaur) यांना उच्च न्यायालयाने जोरदार दणका दिला आहे. त्यामुळे अपक्ष खासदार नवनीत राणा यांची खासदारकी धोक्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाकडून (Mumbai High Court) त्यांचे जात प्रमाणपत्र (caste certificate ) रद्द केले आहे. जात प्रमाणपत्र बोगस असल्याप्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. (Amravati MP Navneet Rana-Kaur's caste certificate canceled by Mumbai High Court) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा-कौर यांचे उच्च न्यायालयाने जात प्रमाणपत्र रद्द केल्याने त्यांची खासदारकी धोक्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचं जात प्रमाणपत्र रद्द केले आहे. त्यामुळे नवनित राणा यांची खासदारकी राहणार की जाणार याची उत्सुकता लागली आहे.


नवनीत राणा यांनी 2019ची लोकसभा निवडणूक जिंकली होती. मात्र, त्यांच्या जात प्रमाणपत्राविरोधात शिवसेना नेते माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. अडसूळ यांच्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे.



नवनीत कौर यांचा विवाह 2013 मध्ये रवी राणा यांच्याशी झाला होता. त्यानंतर त्यांनी अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र मिळवले होते. त्याची पडताळणी करण्यात आली होती. या प्रमाणपत्राविरोधात 2017 मध्ये शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांनी याचिका दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाने हे जात प्रमाणपत्र पुन्हा पडताळणीसाठी पाठवले होते. विशेष म्हणजे याच प्रमाणपत्राच्या आधारे नवनीत राणा-कौर यांनी 2019ची लोकसभा निवडणूक लढवली होती आणि त्या विजयी झाल्या होत्या.