नागपूर : अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील शहापूर येथे राहणाऱ्या गणेश हेकडे या कुस्तीपटूने कौटुंबिक वादातून आपल्या पत्नीसह चिखलदरा येथील भीमकुंडात बुधवारी आत्महत्या केली होती. अथक प्रयत्नांतर पत्नीचा मृतदेह दरीतून बाहेर काढला. दुसऱ्या दिवशीही पतीचा मृतदेह बाहेर काढण्यात अपयश आले.
  
दरम्यान, या घटनेतील मृत गणेश याचे मृतदेह बाहेर काढण्यात मुंबई येथील एसडीआरएफच्या पथकाला अनेक अडचणी येत होत्या. अथक प्रयत्नानंतरही गणेशचा मृतदेह बाहेर काढण्यात अपयश आले. त्यामुळे अखेर शनिवारी सायंकाळी कुटुंबाच्या उपस्थितीत दरीवरूनच मृत गणेश हेकडेवर अंतिम संस्कार करण्यात आले.