Mumbai News : राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे  आधीच राज्यातील वातावरण तापलेलं आहे. अशातच आता प्रसिद्ध योगगुरू रामदेव बाबा (Baba Ramdev) यांनी महिलांबाबत वादग्रस्त विधान केलं (Ramdev Baba Statement on Women Clothes) आहे. या विधानाावेळी रामदेव बाबा यांनी अमृता फडणवीसांबद्दलही मोठं वक्तव्य केलं आहे.


काय म्हणाले रामदेव बाबा?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमृता फडणवीस पुरेसे अन्न खातात. पुढील शंभर वर्ष ते म्हाताऱ्या होणार नाहीत. कारण, त्या नेहमी आनंदी राहतात. जसा आनंद अमृता फडणवीस यांच्या चेहऱ्यावर असल्याचं बाबा रामदेव यांनी म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील हायलँड मैदानामध्ये हा कार्यक्रम आयोजत करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्र्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde), अमृता फडणवीस (Amruta Fadnavis), आमदार रवी राणा आणि मंचावर दीपाली सय्यद मंचावर उपस्थित होते.
 
रामदेव बाबांचं वादग्रस्त वक्तव्य
महिला साडी नेसल्यावर, सलवार कुर्त्यावरही चांगल्या दिसतात आणि काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात, असं वादग्रस्त विधान रामदेव बाब यांनी केलं आहे. यावरून आता चांगलाच वाद पेटण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील यांनी बाबांवर हल्लाबोल केला आहे. 


महिलांनी साडी, सलवार घालणे इथपर्यंत ठीक होतं पण पुढचं विधान कितपत योग्य याचा विचार करायला हवा. अमृता फडणवीसांनी तेव्हाच बाबा रामदेव यांच्या कानाखाली मारायला हवी होती, असं रूपाली पाटील म्हणाल्या.