Amruta Fadnavis on Chitra Wagh - Urfi Javed :  महाराष्ट्रात एकीकडे सत्तासंघर्षाची लढाई (Maharastra Political Crisis) सुरु आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे  (Eknath Shinde) यांच्या 'ब्रेकअप' ची पुढची सुनावणी 'व्हॅलेंटाईन डे'(Valentine's Day 2024) ला होणार आहे. तरदुसरी राज्यात उर्फीच्या कपड्यावरुन ट्विटरवॉर (Twitter war) सुरु आहे. उर्फी जावेदच्या कपड्यांवर भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी आक्षेप घेतल्यानंतर उर्फीने त्यांना चांगलंच सुनावलं. या दोघींमधील वाद काही केल्या संपताना दिसतं नाहीय. कारण ट्विटरवर या दोघींचा वाद विकोपाला गेला आहे. एकावर एक ट्वीट त्या एकमेकींना करत आहेत. त्यात आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. 



'उर्फी जे करते त्यात...'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमृता फडणवीस यांच्या वक्तव्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्या म्हणाल्या की, उर्फी एक स्त्री म्हणून जे काही करतेय, त्यात मला वावगं काहीही वाटतं नाही. अमृता फडणवीस यांनी एकप्रकार उर्फीच्या अंतरंगी कपड्यांचं समर्थन केलं आहे. पुण्यातील पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. एवढंच नाही तर त्यांनी दुसरीकडे चित्रा वाघ यांचं पाठराखण केलं आहे, असंही वाटतं. कारण त्या चित्रा वाघ यांचा भूमिकेविषयी म्हणाल्या की, 'प्रत्येकाचे विचार हे वेगळे असतात. चित्रा वाघ यांनी त्यांचे विचार मांडले आणि त्यानुसार त्यांनी कृती केली. यात काही चूक नाही.' या वक्तव्यासोबत त्यांनी एक सल्लाही दिला त्या म्हणाल्या की, नेहमी व्यावसायिक आणि सार्वजनिक आयुष्य हे दोन्ही वेगळवेगळे ठेवायचे असते. 



दरम्यान या अमृता फडणवीस यांच्या वक्तव्यानंतर उर्फीने चित्रा वाघ यांना डिवचण्यासाठी अजून एक ट्वीट केलं आहे. ज्या तिने म्हटलं आहे की, 'अरे यार, देवेंद्रजी यांचा पण support नाही आहे तुम्हाला.'


 



अमृता फडणवीस यांचं नुकताच 'अज मैं मूड बणा लेया' हे गाणे प्रदर्शित झाले. दुसरीकडे अमृता फडणवीस यांनी सोशल मीडियावर (Social media video)  #MoodBanaleya हॅशटॅगसह डान्स चॅलेंज ही मोहीम सुरु केली आहे. स्वतःच्या गाण्यावर अगदी उत्साहात नाचताना अमृता यांनी व्हिडीओ शेअर करुन नेटकऱ्यांना चॅलेंजचा भाग होण्यासाठी आवाहन केलंय.