Ambulance Accident : 13 गरोदर महिला रुग्णवाहिकेत कोंबल्या; रस्त्यात झाला भीषण अपघात
छोटाशा रुग्णवाहिकेत तब्बल 13 महिला कोंबण्यात आल्या होत्या. महिलांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यातच वाहन चालक देखील अत्यंत बेदकारपणे वाहन चालवत होता.
प्रशांत परदेशी, झी मीडिया, नंदुरबार : नंदुरबारमध्ये ( Nandurbar) एका रुग्णवाहिकेला भीषण अपघात झाला आहे. तब्बल 13 गरोदर महिला रुग्णवाहिकेत कोंबण्यात आल्या होत्या. गरोदर मातांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा भीषण अपघात (Ambulance Accident) झाला. मात्र, मोठा अनर्थ टळला आहे. 13 गरोदर महिला थोडक्यात बचावल्या आहेत.
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा लोणखेडे जवळ गरोदर मातांना सोनोग्राफी साठी घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा भीषण अपघात झाला. सुदैवाने या अपघातामध्ये कुठलीही जीवित हानी झालेली नाही. शहाद्यात लोणखेडा अभियंत्रिक महाविद्यालय समोर गरोदर मातेने भरलेली रुग्णवाहिका पलटी झाल्याने 14 जण जखमी झाले असून, यात 13 गरोदर मातांचा समावेश आहे.
धडगाव अतिदुर्गम भागातील तेलखेडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून या गरोदर मातांना सोनोग्राफिसाठी आणले गेले होते. सोनोग्राफी झाल्यानंतर या महिला आपल्या गावाकडे परत घेऊन जाताना, रुग्णवहीका अचानक पालटी झाली. तेलखेडी प्राथमिक आरोग्य केंद्रतून 102 रुग्णवाहिकेने जातं असताना भरधाव वेगात चालाकाचे नियंत्रण सुटल्याने रुग्णवाहिका पलटी झाल्याने हा अपघात झाला. 13 गरोदर महिला पुरूष चालक असे 14 जण अपघातात जखमी झाले आहेत.
आमदार राजेश पाडवी यांच्या खासगी रुग्णवाहिकेतून जखमींना शहादा येथील नगर पालिकेच्या शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सर्व गरोदर मातांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून घटनास्थळी व रुग्णालयात नातेवाईकांनी धाव घेतली आहे.
या अपघाताची शहादा पोलीस ठाण्यामध्ये नोंद करण्यात आली असून, पोलीस या अपघात प्रकरणी अधिक तपास करत आहेत. या अपघातामध्ये नेमकी चूक कोणाची? याचाही शोध पोलीस घेत आहेत. मात्र, सुदैवाने या अपघातामध्ये 13 गरोदर मातांपैकी कोणाच्याही जिवाला धोका पोहोचला नाही, हे महत्त्वाचे, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. या घटनेमुळे रुग्णवाहिका चालकांच्या बेदरकारपणे वाहन चालवण्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. रुग्णालय चालकांना आपत्काळ नसताना रुग्णवाहिका मर्यादित वेगात चालवण्याबाबत निर्देश देणे आता गरजेचे झाले आहे.