stone on railway tracks in pune : नुकतीच राजस्थानमध्ये वंदे भारत एक्सप्रेस बाबत अशा पद्धतीची घटना समोर आली होती. वंदे भारत एक्सप्रेसच्या मार्गावर लोखंडी सळ्या आणि दगड ठेवण्यात आले होते. त्यानंतर आता पुण्यातही तसाच प्रकार उघडकीस आला आहे. मात्र, रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला आहे. नेमका हा प्रकार कोणी केला यामागे कोण आहे ? याचा तपासता रेल्वे सुरक्षा यंत्रणा करत आहेत.


पुणे विभागात रेल्वे ट्रॅक्सवर मोठमोठ दगड


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुणे विभागात रेल्वे ट्रॅक्सवर मोठमोठ दगड आढळून आल्याचं समोर आलंय. हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. यूपी-लाईन चिंचवड-आकुर्डी विभागात रेल्वे ट्रॅकची सिव्हिल एंजिनिअर विभाग पाहणी करत होता. त्यावेळी मोठे दगड रेल्वे ट्रॅकवर ठेवल्याचं या टीमला आढळून आलं. तातडीनं हे दगड हटवण्यात आले. इतके मोठे दगड ट्रॅकवर आले कुठून याचा तपास आता आरपीएफ आणि जीआरपी करतायत.. 


राजस्थानमध्ये वंदे भारत ट्रेनला घातपाताचा कट उधळला


राजस्थानमध्ये वंदे भारत ट्रेनला घातपाताचा कट उधळला. रुळावर  दगड आणि लोखंडी वस्तू  ठेवण्यात आल्या होत्या. लोकोपायलटच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला आहे.