सातारा वाई परिसरात भूकंपाचे दोन धक्के
वाई आणि सातारा परिसरात आज भूकंपाचे दोन तीव्र धक्के जाणवलेत.
सातारा : वाई आणि सातारा परिसरात आज सकाळी ७ वाजून ४८ मिनिटांनी तर दुसरा ८ वाजून २७ मिनिटीने भूकंपाचे दोन तीव्र धक्के जाणवलेत. त्यामुळे काही काळ परिसरात भितीचे वातावरण होते, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.
भूकंपाचा पहिला धक्का रिश्टर स्केलवर ४.८ इतक्या तीव्रतेचा होता. तर दुसरा धक्का ३.० इतक्या तीव्रतेचा नोंदवला गेला. पहिला भूकंप १० किलोमीटर तर दुसरा भूकंप ५ किलोमीटर खोलवर भूगर्भात झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
कराड आणि पाटण परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता मोठी असली होती. मात्र, कमी सेकंदाचा भूकंप झाल्याने त्याची तीव्रता जाणवली नाही. तसेच कोणतेही नुकसान झाले नसल्याचे सांगण्यात आले.