सिंदखेडराजा येथे सापडली अकराव्या शतकातील भगवान विष्णूंची शेषशायी मूर्ती
सिंदखेडराजा येथे सापडली उत्खनना दरम्यान अकराव्या शतकातील भगवान विष्णूंची शेषशायी मूर्ती सापडली आहे. ग्रामस्थांनी मूर्ती पाहण्यासाठी गर्दी केली आहे.
Sindkhed Raja : ऐतिहासिक नगरी सिंदखेडराजा येथे राजे लखुजी जाधव यांच्या समाधी समोर पुरातत्व विभागाकडून गेल्या महिनाभरापासून खोदकाम सुरु केले असून त्यात मागील पंधरा दिवसांपूर्वी एक शिव मंदिर आढळून आले आहे. तसेच आता तर भगवान विष्णूंची मूर्ती आढळून आली आहे. ही मूर्ती सावकाश पणे बाहेर काढण्याl येत आहे. ही मूर्ती काढायला अजूनही दोन दिवस वेळ लागणार आहे.
ही मूर्ती बाहेर काढल्या नंतर इतरत्र हलविण्यात येणार आहे. ही मूर्ती इतरत्र हलविण्यात येत असल्याची माहिती स्थानिकांना मिळताच स्थानिकांनी याला विरोध दर्शवला आहे. मूर्ती पूर्णपणे बाहेर काढल्या नंतर सिंदखेडराजा येथील नव्याने उभारण्यात आलेल्या संग्रहालय येथे ही मूर्ती ठेवण्यात यावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
सिंदखेडराजा तालुक्यातील काही ऐतिहासिक वास्तू नष्ट होण्याच्या मार्गावर
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मासाहेब जिजाऊ बाईसाहेब यांचं जन्मगाव सिंदखेडराजा तालुक्यातील काही ऐतिहासिक वास्तू नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यातच आता एक धक्कादायक प्रकार समोर येतोय.. राष्ट्रमाता जिजाऊंचे वडील लखुजीराव जाधव यांचा आडगावराजा इथला भुईकोट किल्ला नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. आडगावराजातील या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यात मोठ्या प्रमाणात गुप्तधनासाठी खोदकाम केलं जातंय. यामुळे संबंधितांनी याची गांभीर्यानं दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी होतेय.
पंढरपुरात विठ्ठलाच्या विटेखाली तळघरात आढळल्या विष्णू आणि देवीच्या मूर्ती
तमाम महाराष्ट्राचं श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आगळा चमत्कार घडला.. मंदिराच्या गाभा-यासमोरील दगड बाजूला करताना तिथं चक्क तळघर सापडलं... पुरातत्व खात्याच्या अधिका-यांनी तत्काळ तिथं धाव घेतली. पुरातत्त्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वहाने आणि वास्तू विशारद तेजस्विनी आफळे तळघर उघडून आत गेले... तेव्हा त्यांना तळघरात विष्णू बालाजी रुपातील 3 ते 4 फूट उंचीची मूर्ती आणि देवीची आणखी एक पुरातन मूर्ती सापडली. त्याशिवाय पुरातन पादुकांचा अनमोल ठेवाही तळघरात सापडला. पुरातन मूर्तींबरोबरच काही नाणीही सापडल्याची माहिती आहे. पुरातत्व विभागाच्या अधिका-यांनी दिली. हा खजिना सापडल्यानंतर महाराष्ट्रभर तर्कवितर्कांना उधाण आलंय.. या मूर्ती तिथं कुणी ठेवल्या, याबाबत नाना प्रकारचे अंदाज वर्तवले जातायत. विठ्ठल मंदिरात सध्या संवर्धनाचं काम सुरुये. हे काम सुरू असतानाच हा प्राचीन खजिना सापडला. या तळघरात उत्खननाचं काम सुरू आहे. तळघरात या मूर्ती कशा आल्या, या मूर्तींचा ऐतिहासिक संदर्भ आहे का, या प्रश्नांची उत्तरं येत्या काळात समोर येतीलच.