Viral Video : राज्यभरात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला जात आहे. तब्बल दोन वर्षांनतर सण साजरे करता येत असल्यामुळे राज्यभर मोठ-मोठ्या दहीहंड्यांचं आयोजन केलेलं दिसत आहे. दहीहंडी पाहण्यासाठी लहानांपासून वयोवृद्ध मोठ्या संख्येने बाहेर पडत आहेत. दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झालेला दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक चिमुकला, तुझ्या घरात नाही पाणी, घागर उताणी रे गोपाळा या गाण्यावर ठेका धरताना दिसत आहे. आजूबाजूला कोण आहे याचं काही त्याला भान नाही, तो पूर्णपणे तल्लीन झालेला दिसत आहे.



चिमुकल्याचा हा व्हिडीओ जुना असून आज परत एकदा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. राज्यात ज्या-ज्या ठिकाणी मोठ-मोठ्या दहीहंड्यांचं आयोजन केलं आहे तिथे तरूणाई मोठ्या संख्येने उपस्थित असलेली दिसली. शिंदे-फडणवीस सरकारने गोविंदांसाठी घेतलेल्या निर्णयामुळे आणखी उत्साह संचारला आहे.


राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहीहंडी हा साहसी खेळामध्ये समावेश करण्याचा निर्णय घेतला असून गोविंदांना सरकारी नोकरीमध्येही 5 टक्के आरक्षण देणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यासोबतच गोविंदांचा मृत्यू झाल्यास 10 लाख रुपये, गंभीर जखमी झाल्यास साडे सात लाख रुपये, तर जखमी झाल्यास 5 लाख अशी नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली आहे.