Anganwadi Sevika Bharati: एकात्मिक बालविकास सेवा योजना या केंद्राकडून पुरस्कार प्राप्त योजनेतून महाराष्ट्र राज्यात अंगणवाड्यात (Anagawadi In Maharashtra) या चालवल्या जातात. त्यामुळे त्यांचे ग्रामीण भागात शैक्षणिकदृष्ट्या महत्त्व अधिक आहे. 2020 साली नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबविले गेले आहे त्यामुळे आता अंगणवाड्यांचा विकास करण्यावर केंद्र सरकार आणि राज्य सरकार लक्ष घालताना दिसत आहे त्याच पार्श्वभुमीवर आता अंगणवाडी येथे 20 हजार 601 जूनी रिक्त पदे (20 Thousand and 601 Empty Positions) भरली जाणार आहेत. आपल्या महाराष्ट्रात अंगणवाड्यांची संख्या आता हळूहळू वाढू लागली आहे त्यामुळे ग्रामीण भागात शिक्षण क्षेत्रात यामुळे बदल आले आहेत आणि त्यासोबतच रोजगारालाही चांलना मिळाली आहे. त्यामुळे आता अंगणवाडीत सेविकांची भरती सुरू करण्यात आली आहे. या हजारो रिक्त पदे भरली जाणार आहेत. (Anganwadi Jobs 20 thousand 601 ladies will be hired in anganwadi for sevika jobs know full details)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंगणवाड्यातील अनेक जागा रिक्त असतात त्यात भरती होणे आवश्यक असते समोर आलेल्या माहितीनुसार, आता महाराष्ट्रातील सर्व भागात असणाऱ्या अंगणवाड्यांमध्ये आता रिक्त असणारी पदे भरली जाणार आहेत. अंगणवाड्यांचे महत्त्व हे ग्रामीण भागांमध्ये खूप मोठं आहे. त्यातून महाराष्ट्रातील अनेक भागात आजही अंगणवाडी कमी आहेत. त्यांचे महत्त्व रोजगाराच्या आणि शिक्षणाच्या दृष्टीनं अधिक आहे त्यामुळे महाराष्ट्रातील महसुली गावात जिथे अंगणवाडी नसतील तिथे नव्या अंगणवाड्याही उघडल्या जातील. 


अंगणवाडीत कोणत्या पदांची होत्येय भरती? 


अंगणवाड्यांमध्ये 2017 पासून पदे रिक्त आहेत. तेव्हा पासून एकूण 20 हजार पदे भरली जाणार आहेत. यामध्ये अंगणवाडी सेविकांचाही समावेश आहे. अंगणवाडी सेविकांचीही पदभरती यानिमित्तानं केली जाणार आहे. तेव्हा यावर्षीच्या म्हणजे 2023 च्या 31 मे पुर्वी, अंगणवाडी सेविका (Sevika), अंगणवाडी मदतनीस (Madatnis), मिनी अंगणवाडी सेविका (Mini Anganwadi Sevika) यांची पदे भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे आदेश एकात्मिक बालविकास आयुक्त रूबल अग्रवाल यांच्याकडून देण्यात आले आहेत. आणि यासाठी सर्व जिल्हा परिषदांना अपडेटही करण्यात आले आहे.


शैक्षणिक पात्रता काय?  


अंगणावाडी सेविकांसाठी 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर कोणतीही पदवी (Graduation), पद्यूत्तर पदवी (Post Graduation), उच्च शिक्षणही ग्राह्य धरले जाईल. त्याप्रमाणे किमान वयोमर्यादा ही 35 वर्षे असणं अनिवार्य आहे. तुम्ही जर का या सर्व पात्रतेत बसत असाल तर तुमच्यासाठी ही एक चांगली संधी आहे. 


कोणकोणत्या पदांना महाराष्ट्रात मंजूरी? 


मिनी अंगणवाडी सेविका - 13 हजार 11 
अंगणवाडी मदतनीस - 2 लाख 7 हजार 
अंगणवाडी सेविका - 97 हजार 475
- रिक्त पदे - 20 हजार 601 पदे