सांगली : अनिकेत कोथळे हत्या प्रकरणी दररोज नवे खुलासे होत असून आता पुन्हा एक नवा खुलासा झालाय. अनिकेत हत्ये प्रकरणी एका खाजगी डॉक्टरची सीआयडीकडून चौकशी करण्यात आलीये. या डॉक्टरच्या दवाखान्यातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आलय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरोपी युवराज कामटेने अनिकेतची कोठडीत हत्या केल्यानंतर अनिकेतचा मृतदेह खासगी दवाखान्यात नेला होता. त्या डॉक्टराची सीआयडीकडून चौकशी करण्यात आलीय. अनिकेत कोथळे हत्या प्रकरणातील आरोपी बडतर्फ पीएसआय युवराज कामटे आणि अन्य आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. 


दरम्यान, अनिकेत कोथळे हत्या प्रकरणामध्ये पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही फूटेज डिलीट करण्यात आलं. याप्रकरणी सीआयडीनं एकाला ताब्यात घेतलं आहे. अनिकेतला पोलीस कोठडीत मारहाण करतानाच्या वेळचे सीसीटीव्ही फूटेज डिलीट करण्यात आलं होतं. 


दरम्यान अनिकेत कोथळे हत्या प्रकरणातला मुख्य सूत्रधार पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे याच्या घरी सीआयडीचं पथक दाखल झालं. दोन तास या पथकानं कामटेच्या घराची झडती घेतली. यावेळी युवराज कामटे हा सुद्धा या पथकासोबतच होता.