नवी दिल्ली : माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी सुरू आहे. तीन दिग्गज वकील युक्तीवाद करत आहेत. अभिषेक मनु सिंघवी (Abhishek Manu Singhavi), कपिल सिब्बल (Kapil Sibbal) आणि हरीश साळवे (Harish Salve) सुनावणीला हजर आहेत. सिब्बल हे अनिल देशमुख यांच्यातर्फे युक्तीवाद करत आहेत. अभिषेक मनु सिंघवी हे राज्य सरकारतर्फे युक्तीवाद करत आहेत. तर हरीश साळवे हे जयश्री पाटील यांच्यातर्फे युक्तीवाद करत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जयश्री पाटील यांची रेकॉर्डवर नसलेली रिट ऐकली गेली व त्यासंदर्भात आदेश देण्यात आला असा युक्तीवाद सिंघवी यांनी सर्वोच्च न्यायालयात केला.  या याचिकेच्या गुणवत्तेवर युक्तिवाद करण्याची योग्य संधी राज्याला देण्यात आली नव्हती. सीबीआय चौकशी लावताना राज्याला विश्वासात घेतले नाही युक्तिवाद फक्त देखभाल करण्यावरच होतो. जयश्री पाटील यांनी रिट दाखल करण्याची वेळही शंकास्पद आहे. आरोप झाल्यानंतर अनिल देशमुख यांनी तात्काळ राजीनामा दिलाय असे सिंघवी यांनी महाराष्ट्र राज्यासाठी युक्तिवाद करताना म्हटले. 


भ्रष्टाचाराचे हे सर्व प्रकरण गंभीर आहे. गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला असला तरी हायकोर्टाचा आदेश अयोग्य आहे असं म्हणता येणार नाही असे सुप्रीम कोर्टाने म्हटले. गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा दिला नाही. तर सीबीआय चौकशीचा आदेश हायकोर्टानं दिल्यानंतरच गृहमंत्र्यांनी राजीनामा दिलाय.



त्रयस्थ यंत्रणेनं या प्रकरणाची चौकशी करणं गरजेचं असल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले. 


परमबीर सिंग यांनी केलेले सर्व आरोप तोंडी आहेत. हे काय पुरावे नाहीत. वाझे, भुजबळ गृहमंत्री यांनी पैसे मागितले.. पण पुरावा काय ? असा प्रश्न कपिल सिब्बल यांनी उपस्थित केला. परमबीर सिंग यांचा ई मेल ग्राह्य धरता येत नाही. कायद्यात तो पुरावा ग्राह्य धरला जाऊ शकत नाही. 


ज्येष्ठ अधिकाऱ्यांना ज्येष्ठ मंत्र्यांवर आरोप केले आहेत हे गंभीर नाही का ? असे सुप्रीम कोर्टाने म्हटले. 


दरम्यान या आरोपात काही तथ्य नाही. अनिल देशमुख यांना विचारलं गेलं नाही. त्यांचे म्हणणे का ऐकले नाही. देशमुखांच्या अधिकाराचं काय ? असा प्रश्न कपिल सिब्बल यांनी उपस्थित केला. 


प्राथमिक चौकशी होत असेल तर तुमची काय हरकत आहे असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांना विचारला.