कोल्हापूर : Kirit Somaiya Talathi ? : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचे त्यांच्या पक्षात काय महत्त्व, हे सगळ्यांनाच माहिती आहे, अशी टीका शिवसेना खासदार प्रतापसिंह जाधव (Shiv Sena MP Pratap Singh Jadhav) यांनी सोमय्या यांच्यावर केली आहे. सोमय्या यांचं त्यांच्या पक्षात काय महत्त्व आहे, खोट्या प्रसिद्धीसाठी स्वतःचं गमावलेलं अस्तित्व पक्षामध्ये जिवंत ठेवण्यासाठी चालवलेला हा उपद्रव आहे. सातबारे कोरे करायला ते काय तलाठी आहेत का, असे म्हणत  प्रतापसिंह जाधव यांनी सोमय्या यांच्यावर टीका केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, शिवसेना नेते मंत्री अनिल परब यांच्यावर पडलेल्या ईडीच्या धाडीसंदर्भात खासदार जाधव म्हणाले की, महाराष्ट्रात जेव्हापासून भारतीय जनता पक्षाच्या हातून सत्ता गेली, तेव्हापासून त्यांनी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केले आहे. ते महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांना जाणीवपूर्वक बदनाम करण्यास सुरुवात केलेली आहे. त्यामुळे आता सुद्धा ज्या धाडी पडतायेत त्या जाणीवपूर्वक शिवसेनेला बदनाम करण्यासाठी आहेत, असे जाधव यावेळी म्हणाले.


मंत्री अनिल परब यांचे सर्व घोटाळे बाहेर काढणार आहे. त्यांचा सातबारा मी कोरा करणार आहे, असे थेट आव्हान  किरीट सोमय्या यांनी दिले आहे. ते पुढे म्हणाले, अनिल परब म्हणतात 'तो मी नव्हेच'. मग साई रिसॉर्टचा टॅक्स अनिल परब यांनी कसा भरला. दापोलीतील रिसॉर्टचा प्रॉपर्टी टॅक्स भरल्याची पावती यावेळी सोमय्या यांनी दाखवली. त्यानंतर शिवसेनेकडून प्रत्युत्तर आले आहे.


दरम्यान, मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्याशी संबधित 7 ठिकाणी ईडीने काल छापेमारी केली. या प्रकरणी बोलताना भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्यावर टीका केली आहे.