अहमदनगर : जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे आजारी आहेत. त्यांची तब्बेत खालावली असून त्यांना उपचारासाठी अहमदनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे. उपोषणानंतर अण्णांना अशक्तपणा जाणवत होता. अण्णा यांना थोडे बरे वाटत नव्हते. रात्री त्यांच्या डाव्या हाताला मुंग्या येत असल्यामुळे डॉक्टर तपासणी करण्यात आली. मात्र, गावातील डॉक्टरांनी नगर येथे तपासणीसाठी जाण्याचा सल्ला दिला. 


सकाळी अहमदनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली. अण्णांच्या डोक्यात रक्ताची गाठ जाणवत असल्याचे म्हटले असून त्यांना २४ तास रुग्णालयात आराम करण्याचा सल्ला दिला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.