पुणे: डीएसके भ्रष्टाचार प्रकरणी अनुराधा पुरंदरेंना येरवडा कारागृहात नेऊन चौकशी करण्यात येणार आहे. डी एस कुलकर्णी यांची मेहुणी अनुराधा पुरंदरे हिची कारागृहात नेऊन डी एस कुलकर्णी आणि हेमंती कुलकर्णी यांच्यासमक्ष चौकशी करायला न्यायालयानं परवानगी दिली आहे. डी एस कुलकर्णी आणि त्यांची पत्नी हेमंती यांना यापूर्वीच अटक करण्यात आली असून, ते सध्या येरवजडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत.


अशा प्रकारे चौकशीची पहिलीच वेळ


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशा प्रकारे कारागृहात नेउन आरोपींची चौकशी करण्यास परवानगी मिळण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असेल. आता ३० आणि ३१ मे रोजी अनुराधा पुरंदरेंना येरवडा कारागृहात नेउन डीएसके आणि हेमंती कुलकर्णी यांच्या समक्ष त्यांची चौकशी होणार आहे. डीएसकेंची मेहुणी अनुराधा पुरंदरेना निगडीमधून रविवारी अटक करण्यात आली होती.


तब्बल २ हजार ४३ कोटींच्या भ्रष्टाचाराचा गुन्हा


डी एस कुलकर्णी आणि त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्या तब्बल २ हजार ४३ कोटींच्या घोटाळ्याचा गुन्हा नोंदवण्यात आला असून या प्रकरणी आतापर्यंत  सात  जणांना अटक करण्यात आली आहे .सहाय्यक पोलिस आयुक्त निलेश मोरे या प्रकरणाचा तपास करत असून .आतापर्यंतच्या तपासात डी.एस .कुलकर्णी आणि इतर अनेक संबधितांच्या सुमारे ४५९ मालमत्ता , २७५ बॅक़ खाती आणि सुमारे ३२ गाड्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. 


अनुराधा पुरंदरेंना येरवडा कारागृहात नेउन चौकशी करण्याची परवानगी


 सोमवारी अटक  करण्यात आलेल्या डी एस कुलकर्णी यांची मेहुणी अनुराधा पुरंदरे हिची कारागृहात नेउन डी एस कुलकर्णी आणि हेमंती कुलकर्णी यांच्यासमक्ष चौकशी करण्यास परवानगी देण्याची विशेष सरकारी वकिल प्रवीण चव्हाण यांनी केलेली मागणी न्यायाधिश जे टी उत्पात यांनी  मान्य केली. डी एस कुलकर्णी  आणि त्यांची पत्नी हेमंती यांना यापूर्वीच अटक करण्यात आली असून सध्या ते येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत.