मुंबई : कोरोनाचा फैलाव वाढत आहे. राज्यात कोरोनाने चांगलेच हातपाय पसरले आहेत. त्यामुळे लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, लॉगडाऊनचा अनेक ठिकाणी फज्जा उडाला आहे. त्यामुळे काही ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. भाजी मार्केट, दुकान, बँक याठिकाणी मोठी गर्दी होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत गर्दी होत असल्याने काही दिवस मार्केट बंद ठेवण्यात आले होते. आज पुन्हा मुंबई  उत्पन्न बाजार समिती सुरु करण्यात आली आहे. मात्र, गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आता ड्रोनची नजर असणार आहे.


भाजीपाला, कांदा-बटाटा मार्केट सुरु


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बाजार समितीमधील सोशल डिस्टन्सिंग नियम पाळला जातो की नाही, यावर ड्रोनच्या माध्यमातून नजर असणार आहे. जर कोणी या नियमाचा भंग केला तर त्याच्यावर कारवाई होईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. तसेच काही नियमही करण्यात आले आहे. त्या नियमानुसार काम सुरु राहणार आहे. यात कोणाला माल मागवायचा असेल तर त्यांनी बाजार समितीच्या भाजीपाला विभागाच्या कार्यालायत येणाऱ्या मालाची माहिती आदल्या दिवशी लेटरपॅडवर गाडी क्रमांकसह द्यावी लागणार आहे. जे व्यापारी याची माहिती बाजार समितीला देतील त्यांनाच बाजार समितीत प्रवेश मिळेल. मालाच्या गाड्यांच्या विचार करुन मार्केटमध्ये प्रवेश दिला जाणार आहे.


कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळण्यासाठी आणि गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बाजार समिती आवारात पोलिसांकडून ड्रोनचा वापर केला जाणार आहे. भाजीपाला, कांदा-बटाटा आणि धान्य मार्केट आज सुरु करण्यात आले आहे. आज सकाळी मार्केटमध्ये १८० गाड्यांची आवक झाली होती.