प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, अलिबाग :  रिपब्लिकन चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांचा न्यायालयात फोन सुरू होता. अर्णब गोस्वामी हे त्यांच्या पत्नीशी फोनवरुन बोलत असल्याचं न्यायालयाच्या निदर्शनास आलं. तेव्हा न्यायमूर्तींनी अर्णब गोस्वामी यांना समज देताना म्हटलं. तुम्हाला माहित नाही का न्यायालयात फोन बंद ठेवायचा असतो, फोन बंद करा तो, अशी समज अर्णब गोस्वामी यांना देण्यात आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यानंतर अर्णब गोस्वामी यांनी कोर्टात बोलताना सांगितलं, मला पोलिसांनी मारहाण केली, एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे यांनी देखील मारहाण केल्याचा आरोप अर्णब गोस्वामी यांनी कोर्टात केला. अर्णब गोस्वामी यांनी मारहाणीचे आपल्याला व्रण असल्याचा दावा केला. हे व्रण दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी कोर्टात केला.


कोर्टात अर्णब गोस्वामी यांनी व्रण दाखवण्याचा प्रयत्न केला तेव्हा, कोर्टाने नकार दिला आणि सांगितलं, तुम्ही असे कोर्टात व्रण दाखवू शकत नाहीत. तुमची पुन्हा एकदा वैद्यकीय चौकशी केली जाईल, यानंतर पुढील सुनावणी होईल. यानंतर बाजूलाच पोलीस स्टेशनमध्ये वैद्यकीय टीम उपस्थित झाली, अर्णब यांची वैद्यकीय चौकशी केल्यानंतर पुन्हा कोर्टात सुनावणी होणार आहे.