जालना : कृत्रिम पाऊस पाडणारे अमेरिकेचे विमान औरंबादेत काय तर भारतातही न पोहोचू शकल्याने शासनाच्या भुमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. सरकारन शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळत असल्याचा ठपका ठेवण्यात येत होता. पण आता कृत्रिम पाऊस पाडणारं अमेरिकेचं विमान उद्या औरंगाबादमध्ये दाखल होणार असल्याचे  राज्याचे स्वच्छता आणि पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी स्पष्ट केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलग 2 दिवस प्रयत्न करूनही मराठवाड्यात पाऊस पाडण्यात अपयश आल्यानं कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी राज्य सरकारने अमेरिकन तंत्रज्ञानाचा आधार घेण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे मराठवाड्यातील दुष्काळ ग्रस्त भागात पाऊस पाडण्यासाठी अमेरिकेचं विमान बोलावण्यात आलंय. 



आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत हे विमान औरंगाबाद मध्ये दाखल होणार असून ढगांची चाचपणी करून पुन्हा अमेरिकन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कृत्रिम पाऊस पाडणार असल्याचं राज्याचे स्वच्छता आणि पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी म्हटलंय.ते जालन्यात बोलत होते.


कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने स्वच्छतेचं मोठं आव्हान उभं राहिलंय.शिवाय पिण्याच्या पाण्याचा देखील प्रश्न गंभीर बनलाय. अशा परिस्थितीत या भागात टँकरने पाणीपुरवठा केला जाणार असून यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देण्यात असल्याचंही लोणीकर यांनी म्हटलंय.


17 तारखेला ते विमान भारतात दाखल होईल. अहमदाबादमध्ये कस्टम विभागाच्या प्रक्रिया पूर्ण करून १८ तारखेला विमान औरंगाबाद विमानतळावर प्रयोगासाठी सज्ज असेल असं सांगण्यात येते.