नितेश महाजन, झी 24 तास, मुंबई : राज्यात लवकरच कृत्रिम पाऊस पाडणार असल्याची माहिती पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली. मराठवाड्यात कमी पावसामुळे नागरिकांची चिंता वाढली आहेत. त्यामुळे कृत्रिम पाऊस पाडण्याच्या दृष्टीने राज्य मंत्रिमंडळात चर्चा झाली आहे. राज्य सरकारने कृत्रिम पाऊस पाडण्याच्या दृष्टीने लागणाऱ्या परवानग्यांसाठी केंद्र सरकारकडे अर्ज केले आहेत, त्या परवानग्या लवकरच मिळणार आहेत. कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी लागणाऱ्या विमानाला औरंगाबाद विमानतळावरुन उड्डाणाची परवानगी घ्यावी लागणार आहे. तसेच कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी लागणारी रडार यंत्रणेचीही परवानगी घ्यावी लागणार आहे, अशी माहिती बबनराव लोणीकर यांनी दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


इस्राईल आणि गुजरातच्या धर्तीवर राज्यातील पहील्या वॉटर ग्रिडचा प्रोजेक्ट जालना जिल्ह्यातील परतूर मंठा तालुक्यातील 176 गावात संयुक्त होत आहे. या प्रोजेक्टची हायड्रोलिक टेस्ट पाणी पुरवठा मंत्री लोणीकर यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी त्यांनी सर्व कामकाजाची पाहणी करत येत्या एक महिन्यात तालुक्यातील शंभर गावांना केवळ सात रुपयात एक हजार लिटर पाणी मिळणार असल्याची माहिती  दिली.



सातत्याने मराठवाडा दुष्काळात होरपळून निघत आहे. त्यामुळे पुढील पिढ्यांना हा दुष्काळ पाहावा लागू नये म्हणून राज्य सरकारने मराठवाडा वाटर ग्रिड चा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. त्यासाठी निधीची तरतूद झाली असुन इस्त्राईल, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया या देशांची मदत मिळणार आहे. लवकरच याच्या निविदा निघून प्रत्यक्ष कामाला सुरवात होईल. हे पाणी पिण्यासह, शेती आणि उद्योग धंद्याना देखील मिळणार असल्याची माहिती त्यांनी दिली.