मुंबई : राज्यात महाविकास आघाडी सत्तेत येताच राष्ट्रवादीच्या अजित पवार यांना विदर्भातील सिंचन गैरव्यवहार प्रकरणात पूर्णत: क्लीन चीट देण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पोलिस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांनी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात दाखल केलेल्या शपथपत्रात अजित पवार यांच्याविरूद्ध कोणतीही फौजदारी कारवाई करता येणार नाही असं नमूद केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विदर्भातील सिंचन गैरव्यवहाराची चौकशी सीबीआयकडे देण्यात यावी, अशी विनंती करणाऱ्या जनहित याचिकांवर अंतिम सुनावणी होणार होती. त्यापूर्वीच एसीबीने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना गैरव्यवहाराबाबत जबाबदार धरता येणार नाही, तसंच त्यांच्याविरूद्ध फौजदारी कारवाई करता येणार नाही, असं शपथपत्र हायकोर्टात दाखल केलं. 



सदर गैरव्यवहार हा केवळ प्रशासकीय हयगय या स्वरूपाचा आहे. याआधी चौकशी केलेल्या वडनेरे, पांढरे किंवा माधवराव चितळे समितीने अजित पवार यांना जबाबदार धरलं नव्हतं. त्यामुळे या प्रकरणाची सर्व जबाबदारी फक्त विदर्भ सिंचन विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक, जलसंपदा विभागाचे सचिव, अवर सचिव यांच्यावरच आहे. त्याशिवाय राज्य सरकारच्या रूल्स ऑफ बिझनेसमध्ये संबंधीत खात्याच्या सचिवांनी कोणताही निर्णय घेण्याकरिता संबंधीत मंत्र्यांना माहिती देणे आवश्यक आहे. त्यामुळे या प्रकरणाची जबाबदारी जलसंपदा खात्याच्या सचिवांवर आहे, असं एसीबीने शपथपत्रात ठळकपणे नमूद केले आहे.


काय आहे सिंचन गैरव्यवहार प्रकरण? 


अजित पवार यांच्या कार्यकाळात विदर्भातील गोसीखुर्द आणि जीगाव सिंचन प्रकल्पात घोटाळा झाल्याचा आरोप काही संघटनांनी केला होता. हा तब्बल ७० हजार कोटींचा गैरव्यवहार होता. यासाठी ज्या प्रकल्पाचं कंत्राट ज्यांना देण्यात आलं होतं त्या राष्ट्रवादीचे आमदार संदिप बाजोरिया यांना  मोठी आगाऊ रक्कमही देण्यात आली होती. रक्कम दिल्यानंतरही या प्रकल्पाचं काम रखडलं आणि हा प्रकल्प अर्धवटच बंद पडला होता.