पुणे : आषाढी वारीचा (Ashadhi Wari) तिढा सुटलेला आहे. आता सर्व मानाच्या पालख्यांना परवानगी देण्यात आली आहे. देहू आळंदीत प्रस्थानासाठी 100 वारकऱ्यांना परवानगी दिली आहे. तर प्रस्थान सोहळ्यात 50 वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली अशी माहिती, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. (Ajit Pawar Decision on Wari)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता सर्व मानाच्या पालख्यांना परवानगी देण्यात आली आहे. देहू आळंदीत प्रस्थानासाठी रवाना होतील. मानाच्या पालखी प्रस्थान सोहळ्यात 50 वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे. यावर्षीही पालखी सोहळा बसमधूनच होणार आहे. पंढरपूरपर्यंत पायी वारी यावर्षीही होणार नाही. मात्र यावर्षी दोन बसेस पालखी सोहळ्यासाठी देण्यात आल्या आहेत. इतर वारकरी मात्र दर्शनासाठी येऊ शकणार नाहीत. मंदिर अन्य भाविकांच्या दर्शनासाठी बंद असेल, असा निर्णय घेतला आहे.


अजित पवार यांची पत्रकार परिषद



-आषाढी वारीचा तिढा सुटला
-10 मानाच्या पालख्यांना परवानगी 
-देहू आणि आळंदी सोहळयात 100 वारकऱ्यांना परवानगी 
-मानाच्या पालखी प्रस्थान सोहळ्यात 50 वारकऱ्यांना परवानगी
- यंदाही वारी बसमधूनच होणार आहे. 
- सर्व पालख्यांना पंढरपूरपर्यंत दोन बसेस, एका बसमधून 30 वारकऱ्यांना परवानगी
- इतर वारकरी दर्शनासाठी येऊ शकणार नाही 
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय तपासणी बंधनकारक 
- काला आणि रिंगण ला परवानगी दिली 
- रथोत्सवला ही परवानगी, त्यासाठी 15 वारकऱ्यांना परवानगी