पुणे : नारायण राणे सध्यातरी कॉंग्रेसमध्येच आहेत. पण, ते कॉंग्रेसला सोडून कोठे जातील असे वाटत नाही. तशा स्वरूपाची चर्चाही नाही. पण, अनेकदा अशा चर्चा होत राहतात. त्यामुळे केवळ अशा चर्चांवरून बोलणे योग्य ठरणार नाही, असे मत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चव्हाण यांनी गणेशोत्सवाचे औचित्य साधत पुण्यातील खडकी येथील कार्यकर्त्यांची भेट घेतली. तसेच, गणेशोत्सव मंडळांनाही भेट दिली. या भेटीनंतर त्यांनी खडकीचे माजी उपाध्यक्ष, नगरसेवक मनीष आनंद यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. मेळाव्यानंतर चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधला.


कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करण्यापूर्वी चव्हाण यांनी कार्यकर्त्यांची मतेही जाणून घेतली. तसेच, पुन्हा नव्याने सुरूवात करूया असे अवाहन करत नव्याने तयारीला लागा अशा सूचनाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.