नवी मुंबई : नवी मुंबईच्या अश्विनी बिद्रे यांच्या मृतदेहाचे अवशेष आज शोधण्यात येणार आहे. घोडबंदर जवळच्या वर्सोवा खाड़ीत शोधमोहीम ससुरू केली जाणार आहे. यासाठी नौदलाची मदत घेण्यात येणार आहे. 


पोलिसांसमोर आव्हान


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अश्विनी बिद्रे यांच्या मृतदेहाचे तुकडे वर्सोवा खाड़ीत एका लोखंडी पेटीत ठेवून ती पेटी वर्सोवा खाडित फेकली होती. आता या मृतदेहाचे अवशेष शोधने नवी मुंबई पोलीसांपुढे पुढे मोठे आव्हान असणार आहे.


गुन्ह्याची कबूली


मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याला राजू पाटील, कुंदन भांडारी आणि महेश याने वेगवेगळ्या पद्धतीने मदत केली. हा तपास संगीत अल्फान्सो यांनी गतवर्षी केला होता पण तपास पूर्ण होता होता त्यांची बदली झाली होती. परंतु पुन्हा त्यांना घेतल्यानंतर या तपासाला वेग आलाय. आरोपीनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. परंतु या तपासाला उशीर झाल्याने तपासातील पुरावे नष्ट  होण्याची भीती अश्विनीचे पती राजू गोरे यांनी केली आहे. 


काय आहे प्रकरण?


याच त्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे ज्या ११ एप्रिल २०१६ पासून बेपत्ता होत्या. कोल्हापूर जिल्ह्यातलं आळते हे अश्विनी बिद्रे यांचं मूळ गाव. २००० सालापासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या अश्विनी यांची २००६ साली पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली. त्यापूर्वी २००५ साली त्यांचा राजू गोरे यांच्याशी विवाह झाला. पोलीस दलात रुजू झाल्यानंतर अश्विनी बिद्रे यांचं पोस्टिंग पुणे आणि नंतर सांगलीत झालं. सांगलीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याच्याशी त्यांचा परिचय झाला आणि त्याचं रुपांतर प्रेमात झालं. बिद्रे यांना एक मुलगी असतानाही त्यांचं प्रेम प्रकरण सुरुच होतं. २०१३ साली रत्नागिरीत सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी रुजू झाल्यानंतरही बिद्रे यांच्याकडे कुरुंदकर याचं जाणयेणं होतं. 


या सर्व प्रकारामुळे राजू गोरे आणि कुटुंबीयही व्यथित होते. यातूनच कुरुंदकर आणि अश्विनी बिद्रे यांच्यात सतत वाद होत होते. अश्विनी यांना गायब करण्याच्या धमक्याही कुरुंदकर याने अश्विनी बिद्रे यांच्या पतीला दिल्या होत्या. याच काळात २०१६ साली अश्विनी यांची बदली कळंबोली पोलीस ठाण्यात झाली, मात्र त्या कामावर रुजू झाल्याच नाहीत. ११ एप्रिल २०१६ या दिवशी अश्विनी बेपत्ता झाल्या. १४ एप्रिल २०१६ या दिवशी त्यांच्या मोबाईवरुन विपश्यनेला जात असल्यानं आपल्याला सहा महिने शोधू नये, अशा स्वरुपाचा मेसेज कुटुंबीयांना मिळाला. त्यानंतर तो मोबाईल ट्रेस होऊ शकलाच नाही. 


विशेष म्हणजे दोनच दिवसांपूर्वी अश्विनी यांनी १७, १८ आणि १९ एप्रिल २०१६ रोजी कोल्हापूरला जाण्यासाठी सुट्टी मिळावी असा अर्ज वरिष्ठांना केला होता. यातून संशय आणखीनच बळावला. दरम्यान त्या सेवेवर हजर झाल्या नसल्याचं पत्र पोलीस खात्यानं अश्विनी बिद्रे कुटुंबीयांना पाठवलं. चार महिने वाट पाहूनही अश्विनी परत न आल्यानं त्यांचे कुटुंबीय धास्तावले. याच काळात अश्विनी यांच्या लॅपटॉपमध्ये अभय कुरुंदकर याच्याशी प्रेमाचे, तसंच मारहाणीचे सर्व संवाद आणि व्हिडिओ कुटुंबीयांच्या हाती लागले. त्यानंतर १४ जुलै २०१६ रोजी घरच्यांनी या प्रकरणी नवी मुंबईतल्या कळंबोली पोलिसांत सर्व पुराव्यांनिशी तक्रार दाखल केली. मात्र त्यानंतरही अभय कुरुंदकरवर कारवाई झाली नाहीच, उलट कुरुंदकर तातडीनं रजेवर गेला. 


३१ ऑगस्ट २०१६ रोजी अश्विनी बिद्रे यांच्या कुटुंबीयांनी नवी मुंबईचे तत्कालीन पोलीस आय़ुक्त हेमंत नगराळे यांची भेट घेतली आणि हा तपास गुन्हे शाखेकडे द्यावा अशी विनंती केली. मात्र ही मागणी फेटाळण्यात आली.