खासदार निलेश लंके यांच्या PA वर प्राणघातक हल्ला; लोकसभा निवडणुकीनंतर पारनेरमध्ये राडा
लोकसभा निवडणुकीनंतर पारनेरमध्ये मोठा राडा झाला आहे. खासदार निलेश लंके यांच्या PA वर प्राणघातक हल्ला झाला आहे.
Ahmednagar Lok Sabha Election Result 2024 : लोकसभा निवडणुकीनंतर अहमदनगरच्या पारनेरमध्ये तुफान राडा झाला आहे. खासदार निलेश लंके यांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला करण्यात करण्यात आला आहे. हल्लेखोरांनी राहुल झावरे यांची कारवर हल्ला करण्यात आला. कारच्या काचा फोडून त्यांना मारहाण करण्यात आलीय आहे. या मारहाणीत झावरे किरकोळ जखमी झालेत असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या घटनेनंतर पारनेरमध्ये तणावाचं वातावरण असून घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
जुन्या वादातुन पारनेरचे माजी नगराध्यक्ष विजय औटीआणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचे समजते. खासदार निलेश लंके समर्थक राहुल झावरे यांच्यावर हल्ला झाला आहे.या हल्ल्यानंतर झावरे यांना अहमदनगर येथे उपचारासाठी हलवलेले आहे. घटनेनंतर पारनेर पोलीस स्टेशन परिसरात मोठी गर्दी झाली आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणुन पारनेर पोलीस स्टेशनला मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्थ तैनात केला आहे. यावेळी पारनेर पोलीस स्टेशनला लंके समर्थक आणि औटी समर्थक एकमेकांना भिडले. यावेळी पोलीसांची सुध्दा चांगलीच दमछाक झाली.
लोकसभा निवडणुक लढविण्यासाठी त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला
अतिशय चुरशीच्या झालेल्या अहमदनगर लोकसभा मतदार संघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके निवडून आलेत. लोकसभा निवडणुक लढविण्यासाठी त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. निलेश लंकेंच्या विजयासाठी अखेर त्यांचे होमग्राउंड असलेल्या पारनेर तालुक्याचे मतदान निर्णायक ठरलेत. आणि निलेश लंके हे विजयी झालेत.