सुशीलकुमार शिंदेंच्या वक्तव्यानंतर नवाब मलिक यांची प्रतिक्रिया
सुशीलकुमार शिंदे यांचे हे वैयक्तिक मत असल्याचे राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.
मुंबई : 'भविष्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष एकत्र येतील', असं भाकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापुरात केलं होतं. राष्ट्रवादीचे उमेदवार मनोहर सपाटे यांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनासाठी ते आले होते. सुशीलकुमार शिंदे यांचे हे वैयक्तिक मत असल्याचे राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी स्पष्ट केले. आमच्या पक्षात अशी कुठलीही चर्चा नाही,असा विचार नसल्याचेही ते म्हणाले. या संकटाच्या काळात पवार साहेबांनी धुरा हातात घेतली पाहिजे त्यांच्या अनुभवाने काही बदल होईल अस काँग्रेसच्या नेत्यांना वाटतंय. काँग्रेसचे नेते असं बोलत असले तरी असं काही होणार नाही.
काल उद्धव ठाकरे यांनी केलेल्या घोषणा पाच वर्ष सत्ता असताना का केल्या नाहीत ? असा प्रश्न नवाब मलिक यांनी उपस्थित केला. लोकांमध्ये चीड आहे महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन होणार म्हणून उद्धव ठाकरे आता आश्वासन देत आहेत. झुणका भाकर केंद्र ही दारूची दुकान झाली आहेत यावर आता चायनीज विकल जात चपटी आणि खपटी ची ही दुकान झाली असल्याचा आरोपही त्यांनी केला.
स्वतःच्या कार्यकर्त्यांसाठी यांना दारूची दुकान उघडायची आहेत. जागेचा कब्जा करायचा आहे. आधीच्या झुणका भाकरच काय झालं ? याच उत्तर उद्धव ठाकरे यांनी दिल पाहिजे. मोहन भागवत यांना आर्थिक मंदी दिसणार नाही कारण त्यांची तिजोरी भाजप भरतय. सरकारी तिजोरी मधून त्यांचं सगळं चालतय असा आरोपही मलिक यांनी केला.
काय म्हणाले शिंदे ?
'भविष्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष एकत्र येतील', असं भाकीत नुकतंच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केलं सोलापुरात केलं होतं. राष्ट्रवादीचे उमेदवार मनोहर सपाटे यांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनासाठी ते आले होते. यानंतर, 'विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या २० जागा आणि राष्ट्रवादीच्या २० जागा येतील. दोन्ही पक्षाच्या मिळून ४० जागा आल्या तर शरद पवारांना राज्यसभेवर पाठवायचं असेल, तर दोन्ही पक्षांना विलिनीकरणाशिवाय कोणताही पर्याय नसेल' असं वक्तव्य भाजपा खासदार संजय काकडे यांनी केलं.