जयेश जगड, झी मीडिया, अकोला : अकोला जिल्ह्यात राजकीय रणधुमाळीला सुरूवात झाली आहे. अकोला जिल्ह्यात विधानसभेचे पाच मतदारसंघ आहे. यापैकी चार भाजपच्या तर एक भारिप-बहूजन महासंघाच्या ताब्यात आहे. अकोला जिल्ह्यातील पाचही मतदारसंघात केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे आणि प्रकाश आंबेडकरांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. निवडणुक जाहीर झाल्यानंतर युती आणि आघाडीत मतदारसंघांवरून ओढाताण सुरू आहे. तर वंचितच्या 'एकला चलो रे'च्या भूमिकेनं जिल्ह्यातील पाचही मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. पाचही विधासभेत एकूण १५७७२५४ मतदार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अकोला पश्चिम हा जिल्ह्याचं मुख्यालय असलेला विधानसभा मतदारसंघ  पूर्णतः शहरी असलेल्या या मतदारसंघात ३ लाख ३१ हजार ४५६ मतदार आहेय.  2014 च्या निवडणुकीत भाजपचे गोवर्धन शर्मा येथून 39 हजार  953 मतांनी विजयी झालेत. या लोकसभेत या मतदार संघातून भाजपला सर्वात कमी 15 हजारांची आघाडी येथूनच मिळाली आहेय. भाजपकडून पाचदा आमदार असणार्या गोवर्धन शर्मांसह महापौर विजय अग्रवाल, नगरसेवक हरिष आलिमचंदानी दावेदार आहेत.  काँग्रेस-राष्ट्रवदीची आघाडी असतांना हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला होता. 


मात्र, 2014 च्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या राष्ट्रवादीनं येथे दावा केलाय. राष्ट्रवादीकडून येथे माजी उपमहापौर रफिक सिद्दीकी, यांच्या नावाची चर्चा आहे. काँग्रेसकडून माजी महापौर मदन भरगड यांची उमेदवारीवर प्रामुख्याने दावा केला आहे. शहरात फारशी ताकद नसलेल्या वंचित बहूजन आघाडीकडून डॉक्टर रहमान खान यांच नावं प्रामुख्याने शर्यतीत आहे. शहरातील मुलभूत समस्यांचे मुद्दे याही निवडणुकीत गाजण्याची शक्यता आहेय. 



शहरी आणि ग्रामीण असा संमिश्र तोंडवळा असलेला मतदारसंघ म्हणजे अकोला पूर्व. केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्यासाठी अतिशय प्रतिष्ठेचा मतदारसंघ म्हणजे अकोला पुर्व. या मतदारसंघातून धोत्रेंचे भाचे रणधीर सावरकर हे सध्या भाचे आमदार आहेत. या मतदारसंघाची एकूण मतदारसंख्या ३ लाख ४४ हजार ०१५ इतकी आहे. 2014 मध्ये युतीत सेनेच्या ताब्यातील या मतदारसंघात पहिल्यांदाच भाजपचं कमळ फुललं.  


2014 च्या निवडणुकीत सावरकर हे फक्त 2,440 मतांनी विजयी झाले होतेय. याआधी 10 वर्ष हा मतदारसंघ भारिपच्या ताब्यात होताय. लोकसभेत संजय धोत्रेंना येथून मतदारसंघातील सर्वाधिक जवळपास 50 हजारांची आघाडी याच मतदारसंघात मिळाली.  या मतदारसंघात भाजपाकडून रणधीर सावरकर यांच्याशिवाय माजी नगरसेवक गोपी ठाकरे उमेदवारीच्या शर्यतीत आहे.


यावेळी शिवसेना दबक्या सुरात या मतदारसंघावर दावा करतांना दिसते आहे. सेनेकडून माजी जिल्हा प्रमुख विजय मालोकार, उपजिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांची दावेदारी आहेय. वंचितकडून माजी आमदार हरिदास भदे हे तिकिटाच्या स्पर्धेत आहेय. काँग्रेसकडून प्रमुख दावेदारांमध्ये माजी उपजिल्हाधिकारी अशोक अमानकर यांचा समावेश आहे. याही निवडणुकीत ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था, खारपाणपट्ट्याचा प्रश्न गाजण्याची शक्यता आहे. 


अकोट विधानसभा मतदारसंघात भाजप आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या विरोधात त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बाहेरचे म्हणत रणशिंग फुंकलय. 2014 मध्ये युती तुटली अन सेनेचा हा मतदारसंघ भाजपनं पटकावला आहे. भाजपच्या तिकीटावर शेजारच्या अमरावती जिल्ह्यातील दर्यापूरचे प्रकाश भारसाकळे 31 हजारांवर मतांनी विजयी झालेत. सध्या त्यांच्या विरोधात भाजपच्याच प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकार्यांनी बाहेरचे उमेदवार ठरवत त्यांच्यावर निष्क्रियतेचा ठपका ठेवला आहे. 


या मतदारसंघात तब्बल २ लाख ८५ हजार ५८९ मतदार आहेयेत. लोकसभेत येथून भाजपला 52, 211 मतांची आघाडी मिळाल. भाजपच्या दावेदारांमध्ये आमदार प्रकाश भारसाकळेंसह डाँ. रणजीत सपकाळ, यांच नाव चर्चेत आहेय ... युतीत हा मतदारसंघ शिवसेनेचा परंपरागत मतदारसंघ आहेय. सेनेकडून डाँ. विनित हिंगणकर यांच नावं प्रामुख्याने चर्चेत आहे. 


याशिवाय काँग्रेसकडून प्रा. संजय बोडखे, माजी उपजिल्हाधिकारी अशोक अमानकर यांची दावेदारी आहेय. वंचितकडून  जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या वाघोडे यांच्या नावाची चर्चा आहेय...  मागच्या पाच वर्षांतही मतदारसंघातील रस्ते, उद्योग या समस्या याही निवडणुकीत तशाच आहेयेत.


मतविभाजनामुळे वंचितला लाँटरी लागणारा मतदारसंघ म्हणजे बाळापूर..  2014 मध्ये भाजप, शिवसेना आणि शिवसंग्रामध्ये मतविभाजन झालंय. अन यातून भारिपचे बळीराम सिरस्कार हे 6,939 मतांनी विजयी झाले होते. या मतदारसंघात २ लाख ९५ हजार ४११ मतदार आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या संजय धोत्रेंना या मतदारसंघात 23 हजार 507 मतांची आघाडी मिळाली आहे. 


सध्या भारिप-बहुजन महासंघ अर्थातच वंचितकडून बळीराम सिरस्कार यांच्यासह प्रदेश प्रवक्ते प्रा. डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, डॉ. रहेमान खान यांची नावे प्रामुख्याने चर्चेत आहेत. सिरस्कारांना यावेळी पक्ष अन जनतेची नाराजी भोवण्याची चिन्ह आहे. 


भाजपकडून गतवेळचे उमेदवार जिल्हाधक्ष तेजराव थोरात, माजी आमदार नारायण गव्हाणकर, अशोक मंडले ( जिल्हा अध्यक्ष भाजपा शिक्षक सेल ) , यांची नावे चर्चेत आहे. शिवसेनेकडून जिल्हाप्रमुख नितीन देशमुख, जिल्हा परिषद सदस्या जोत्स्ना चोरे आणि युवासेना जिल्हाप्रमुख विठ्ठल सरप यांची प्रमुख दावेदारी आहेय. शिवसंग्राकडून 2014 मध्ये अपक्ष म्हणून 18 हजारांवर मतं घेतलेले पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप पाटील यावेळीही शिवसंग्रामकडून उमेदवारीचे दावेदार आहेत.


काँग्रेसकडून बाळापुरचे नगराध्यक्ष ऐनोद्दीन खतीब यांच नावे चर्चेत आहेत. तर मतदारसंघावर दावा करणाऱ्या राष्ट्रवादीकडून जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे प्रमुख दावेदार आहेय.  या मतदारसंघातील महत्वाच्या समस्या तशाच असतांना आतापर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाने सकारात्मक प्रयत्न केलेले दिसून येत नाही. 


अनुसचित जातीसाठी राखीव असलेल्या मुर्तिजापूर मतदारसंघात गेल्या दहा वर्षांपासूनन भाजपचं वर्चस्व आहेय. या मतदारसंघाची मतदारसंख्या तब्बल ३ लाख २० हजार ७८३ एव्हढी आहे. 2009 आणि 2014 अशा सलग दोन निवडणुकांमध्ये भाजपचे हरीश पिंपळे यांनी येथून विजय मिळवला. 2014 मध्ये त्यांनी 12,888 मतांनी भारिप-बहूजन महासंघाचा पराभव केला.


लोकसभेत मूर्तिजापूर मतदारसंघात धोत्रेंना 37,885 मतांचं मताधिक्य मिळालं आहे. सध्या आमदार पिंपळे यांना मोठ्या पक्षांतर्गत विरोधाला सामोरे जावे लागत आहे. तर शिवसेनेकडून येथे बंडखोरी होण्याची शक्यता आहे कारण भाजप कार्यकर्त्यां प्रमाणेच शिवसेनेने ही पिंपळेंच्या उमेदवारीला विरोध केलाय.


सध्या भाजपसह इतर सर्वच राजकीय पक्षांमध्ये तिकिटांसाठी राजकीय साठमारी सुरु झाली आहे. भाजपमधून आमदार पिंपळेसह माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रावण इंगळे, राजकुमार नाचणे यांची नावे चर्चेत आहेय. वंचितच्या दावेदारांमध्ये जिल्हा परिषद सदस्या प्रतिभा अवचार प्रमुख दावेदार आहेत. आघाडीत हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहे तर राष्ट्रवादीकडून रवि राठी इच्छूक आहेत. रस्ते आणि पिण्याच्या पाण्याचा मुद्दा याही निवडणुकीत ऐरणीवर असणार आहे.


पुढच्या महिनाभर अकोल्यात राजकीय रणकंदन बघायला मिळणार आहेय. मात्र, प्रत्येक निवडणुक ही जिल्ह्यातील मुलभूत प्रश्नांवर गाजवली जातेय. यावरचा राजकीय पक्षांनी मागितलेला मतांचा जोगवा सर्वच राजकीय पक्षांसाठी आत्मचिंतनाचा विषय आहे. आशा करूयात यावेळी ही परिस्थिती नक्कीच बदलेल.