मुंबई : निवडणूक आयोगानं विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीची संपूर्ण तयारी केली आहे. राज्यात २६९ ठिकाणी मतमोजणी होणार आहे. मतदानासाठी जवळपास दहा हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यात सगळीकडं सकाळी आठ वाजता एकाचवेळी मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतदारसंघातल्या पाच व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्यांची मोजणी केली जाणार आहे. सुरुवातीला इलेक्ट्रॉनिक ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेटची मोजणी होईल त्यानंतर टपाली मतं मोजली जातील. आणि शेवटी ईव्हीएमच्या मतमोजणीला सुरुवात होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मतमोजणी केंद्राच्या परिसरावर सीसीटीव्हीची नजर असणार आहे. शिवाय केंद्रीय सशस्त्र सुरक्षा बल, राज्य राखीव पोलीस दल आणि पोलीस अशी त्रिस्तरीय सुरक्षा या ठिकाणी असणार आहे.


उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झालं आहे. उमेदवारांची धाकधुक वाढली आहे. निवडणुकांचे निकाल लागायला आता अवघी एक रात्र शिल्लक आहे. त्यामुळं उमेदवारांचं टेन्शन नक्कीच वाढलं असणार. काय होणार उद्या या चिंतेनं उमेदवारांना झोप लागणार नाही अशीच स्थिती आहे.