मुंबई : संभाजी भिडे हे विद्वान आहेत. मी त्यांच्यावर काही भाष्य करणार नाही असे विधान वचिंत बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. जगासाठी बुद्ध उपयोगाचा नाही, असे वादग्रस्त विधान करणाऱ्या संभाजी भिडे यांच्यावर वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी टीका केली होती. वंचितने आपल्या 22 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. आता 120 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. वचिंतचे एकुण 142 वंचित चे उमेदवार जाहीर झाले आहेत. उद्या सांयकाळपर्यंत सर्व 288 उमेदवार जाहीर करणार असे प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गोपीचंद पडळकर यांना शुभेच्छा देताना पडळकर निवडणूक झाल्यानंतर पुन्हा वंचित मध्ये येतील असे प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले. तसेच त्यांनी आदित्य ठाकरे यांना देखील शुभेच्छा दिल्या आहेत.


भिडे-आंबेडकर वाद 


संभाजी भिडे ही दंगली घडवणारी व्यक्ती आहे. त्यांना बुद्ध समजणार नाही. लोकशाही व्यवस्थेवर विश्वास नसणाऱ्यांकडून काय अपेक्षा करणार, अशी जळजळीत टीका सुजात आंबेडकर यांनी केली.यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही निशाणा साधला. त्यांनी म्हटले की, पंतप्रधान मोदी आणि संघाचे नेते भारतात असताना स्वत:ला नथुराम गोडसेचे समर्थक म्हणवून घेतात. मात्र, विदेशात गेल्यानंतर त्यांना बुद्धाची आठवण येते, असे सुजात यांनी म्हटले. 
त्यामुळे आता भाजपकडून या टीकेला कशाप्रकारे प्रत्युत्तर दिले जाणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.



'संभाजी महाराजच हवे'


संभाजी भिडे यांनी रविवारी सांगलीत शिवप्रतिष्ठान संघटनेकडून आयोजित करण्यात आलेल्या दुर्गामाता दौडीच्यावेळी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भारताने जगाला बुद्ध दिला, या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्यावर आक्षेप नोंदवला. पंतप्रधान मोदी चुकीचे बोलले. ती चूक महाराष्ट्र दुरुस्त करू शकतो. ते आपलं काम आहे. भारताने जगाला बुद्ध दिला असला तरी बुद्ध काही उपयोगाचा नाही. विश्वाचा संसार सुखाने चालवण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजच हवे असल्याचे यावेळी भिडे यांनी सांगितले.