शिरुर विधानसभा : आजी-माजी आमदारांमध्ये माईक खेचाखेची
ऐन विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आजी-माजी आमदारांमध्ये राजकिय शीतयुद्ध
हेमंत चापुडे, झी मिडीया, पुणे : पुणे जिल्ह्याच्या शिरुर तालुक्यात ऐन विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आजी-माजी आमदारांमध्ये राजकिय शीतयुद्ध रंगलेले असताना एकमेकांचा माईक ओढण्याचा प्रकार रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या 28 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत झाला. यावेळी विद्यमान आमदार बाबूराव पाचर्णे यांनी एका सभासदाला माकड म्हणल्याचे पडसाद संपुर्ण तालुक्यात पडले आहेत. तालुक्यातील कुरुळी गावासह विविध गावांत विद्यमान आमदारांच्या वत्कव्याचा निषेध व्यक्त करण्यात आला.
सध्याची कारखानदारी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे अडचणीत येत असल्याचा आरोप घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि माजी आमदार अशोक पवारांनी केला होता, मात्र कारखान्याकडुन पॉवर परचेस करार करण्यात आलाच नसल्याचे सांगित याला कारखाना प्रशासन दोषी आहे आणि त्याचं खापर सरकारच्या डोक्यावर फोडलं जात असल्याचा पलटवार आमदार बाबुराव पाचर्णें यांनी करत मी माकड हा शब्द कारखान्याच्या एका सभासदाने माकड चाळे केले म्हणून त्याला म्हटलं असल्याचं पाचर्णें यांनी म्हटलंय.
तालुक्याचं पालक म्हणुन लोक प्रतिनिधित्व करत असताना भरसभेत कारखान्याच्याच सभासदाला माकडाची उपमा देण्याचं पाप आमदार बाबूराव पाचर्णें यांनी केल्याची निषेध सभा घेत कुरुळी गावातील नागरीकांनी बंद पाळला याबाबत आमदार पाचर्णें यांनी शेतक-यांना माकडाची उपमा दिल्या प्रकरणी माफी मागण्याची मागावी अन्यथा या माकडांच्या गावात त्यांना पायी ठेवू देणार नाही असा ईशाराच ग्रामस्थांनी दिला आहे.
विधानसभेच्या तोंडावर मतदारांनाच विद्यमान आमदारांकडुन अशी खालच्या पातळीची वागणुक दिल्याने शेतकरी वर्गासह तालुक्यात नाराजीचा सुरु पसरला असताना माजी आमदार आणि कारखान्याचे चेरमन अशोक पवार यांनी भाजप आमदार बाबूराव पाचर्णें यांना लक्ष करत ज्या सभासदांच्या कष्टातुन घोडगंगा साखर कारखाना उभा राहिला त्याच कारखान्यांच्या सभासदाला माकडाची उपमा देणं गैर असल्याचे म्हणत आमदार पाचर्णेंना लक्ष केलय..
ऐन विधानसभा निवडणुकीत रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत झालेल्या गोंधळाने संपुर्ण तालुक्यातील राजकारणाने एक वेगळं वळण घेतलं असून या वक्तव्याचं आत राजकारण व्हायला सुरुवात झालीय.त्यामुळे शिरूर च्या निवडणुक प्रचारात माकडाचा मुद्दा आता चांगलंच गाजणार हे स्पष्ट आहे.