महायुती काँग्रेसचा आधीचा `हा` रेकॉर्ड तोडणार- जावडेकर
यावेळी महायुती ऐतिहासिक मताधिक्याने विजयी होणार असल्याचा विश्वास केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला आहे.
नवी दिल्ली : यावेळी महायुती ऐतिहासिक मताधिक्याने विजयी होणार असल्याचा विश्वास केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला आहे. याआधीचा 221 जागांचा विक्रम काँग्रेसच्या नावावर होता. तो यावेळी मोडला जाईल. केंद्र तसेच राज्य सरकारनं केलेलं काम त्याला कारणीभूत आहे असेही त्यांनी म्हटले.
काँग्रेसची अवस्था वाईट असून त्यांनी आत्मचिंतन करावं असा सल्ला त्यांनी यावेळी काँग्रेस पक्षाला दिला. राष्ट्रवादी पश्चिम महाराष्ट्रापुरती मर्यादित आहे. तोही आम्ही यावेळी ठेवणार नाही, असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादीवरही हल्लाबोल केला.
देशात विकास आणि पर्यावरण यांची सांगड घालावी लागते. 1 झाड कापलं तर 5 झाडे लावावी लागतात. आरे हा पालिकेचा विषय असल्याचे ते म्हणाले.