मुंबई : भाजप आणि शिवसेना युतीचा निर्णय होणार असल्याने बंडखोरीची लागण होण्याची भिती वर्तविण्यात येत होती. बंडखोरीची लागण भाजपला झाली आहे. भाजपला जागा शिवसेनेने न सोडल्याने भाजपचे नेते नाराज झाले आहेत. शिवसेनेने आपला उमेदवार जाहीर केल्याने नाराज झालेले समरजितसिंह घाटगे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ते आता अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगात उतणार असल्याचे सांगण्यात आले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संजय घाटगे यांना शिवसेनेने उमेदवारी दिल्याने समरजितसिंह घाटगे हे नाराज झालेत. समरजितसिंह हे उद्या मेळावा घेवून आपली भूमिका जाहीर करणार आहेत. ते अपक्ष उमेदवारी भरण्याचे उद्याच जाहीर करणार आहेत. कोल्हापूरच्या कागल विधानसभा मतदारसंघातून त्यांनी अपक्ष लढण्याची तयारी केली आहे. दरम्यान, भाजपकडून समरजितसिंह यांची समजूत काढण्यात येणार का, याचीही उत्सुकता आहे.


ते जर अपक्ष म्हणून रिंगात उतरले तर कागलमध्ये आता होणार तिरंगी लढत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. राष्ट्रवादीकडून आमदार हसन मुश्रीफही रिंगणार असणार आहेत. शिवसेनेकडून संजय घाडगे हेही असणार आहे. त्यामुळे याचा फटका हा युतीच्या उमेदवारा होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचा उमेदवार हा तगडा आहे. त्यामुळे युतीसाठी अपक्ष उमेदवाराची डोकेदुखी होणार याचीच चर्चा आहे.


ठळक बाबी :


- शिवसेना भाजप युतीचा निर्णय होणार असल्यानं बंडखोर वाढण्यास सुरूवात
- भाजपचे पुणे म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांचा राजीनामा
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून सुपूर्द केला राजीनामा
- कोल्हापूरच्या कागल विधानसभा मतदारसंघातून अपक्ष लढण्याची तयारी
- शिवसेनेने हा मतदारसंघ भाजपसाठी न सोडता तेथून संजय घाटगे यांना उमेदवारी दिल्यानं समरजितसिंह घाटगे होते नाराज
- उद्या मेळावा घेवून जाहीर करणार अपक्ष उमेदवारी
- कागलमध्ये आता होणार तिरंगी लढत, राष्ट्रवादीकडून आमदार हसन मुश्रीफही रिंगणार असणार