मुंबई : दोघं मिळून लोकांना फूकट जेवण देऊ असे विधान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे. धुळ्यात झालेल्या प्रचारसभेत ते बोलत होते. भाजपातर्फे पाच रुपयात जेवण मिळणार अशा चर्चांच्या पार्श्वभुमीवर त्यांनी हे विधान केले आहे. सत्तेत आल्यावर आपण दहा रुपयात पोटभर जेवण देऊ अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. शिवसेनेच्या वचननाम्यातही याचा उल्लेख आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


भाजपाने याला तोडीस तोड उत्तर देण्यासाठी महाराष्ट्र अटल आहार योजना सुरु करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. बांधकाम कामगारांसाठी ही योजना प्रायोगिक तत्वावर सुरु आहे. ही योजना राज्यभर राबवणार असल्याचे सांगितले जात आहे. शिवसेनेवर कुरघोडी करण्यासाठी भाजपाचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात येत आहे. 


दहा रुयात जेवण आम्ही देत असू तर भाजप पाच रुपयात जेवण देणार असे असेल तर आंनद आहे. उद्या दोन्ही मिळून फुकट देऊ असे उद्धव ठाकरे म्हणाले. 'भाजपाला आम्ही ग्रामीणमध्ये मदत करतो, तुम्ही शहरात करा असे नाटक नको प्रामाणिकपणे करा' असे आवाहनही त्यांनी केले. पाठीमागे वार करण्याची आमची औलाद नको असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी भाजपाला लगावला आहे.