Pune MNS Sainath Babar: मनसे वाया वंचित आघाडीतून शिवसेना ठाकरे गटात आलेल्या वसंत मोरेंना विधानसभेत पाठबळ देण्याचे आश्वासन उद्धव ठाकरेंनी दिले होते. पुण्यातील लोकप्रिय चेहरा असलेल्या वसंत मोरेंना ठाकरे गटातून विधानसभेचे तिकिट मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान वसंत मोरेंचे जिवलग मित्र साईनाथ बाबर यांना मनसेतून विधानसभेचे तिकिट मिळण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला बिनशर्थ पाठिंबा देणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा नारा दिला. निवडून येण्याची क्षमता असलेला आणि लोकप्रिय उमेदवार रिंगणात उतरवणार असल्याचे राज ठाकरेंनी जाहीर केले. दरम्यान पुण्यातून मनसेचा पहिला उमेदवार ठरल्याचे म्हटले जात आहे.


विधानसभेची तयारी सुरु


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी हडपसर विधानसभा मतदारसंघावर दावा केला आहे.  वसंत मोरे यांनी मनसे सोडल्यानंतर हडपसर मधून मनसेचा नवा शिलेदार रिंगणात उतरणार आहे. साईनाथ बाबर यांनी व्हाट्सअप स्टेट्स ठेवत विधानसभेची तयारी सुरु केली आहे. त्यामुळे पुण्यात वसंत मोरे विरुद्ध साईनाथ बाबर असा सामना रंगणार का? हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. दरम्यान हे दोघे एकमेकांविरोधात राहिले तर याचा फायदा भाजपा होणार का? हे पाहणेदेखील महत्वाचे ठरणार आहे. कारण लोकसभा निवडणुकीत याचा धक्का महाविकास आघाडीला बसला आहे. रविंद्र धंगेकर महाविकास आघाडीचे उमेदवार असताना, वंचिककडून वसंत मोरे उभे राहिले. यामध्ये भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांचा विजय झाला. आता मनसेने स्वबळाचा नारा दिल्यावर पुण्यातील राजकारणाची समिकरणे कशी बदलतात? हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे. 


मुंबईतील संभाव्य उमेदवार


दरम्यान मनसेची विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईतील संभाव्य उमेदवारांची यादी सोशल मीडियात फिरतेय. कोण आहेत हे संभाव्य उमेदवार? जाणून घेऊया 


मुंबईतील 36 पैकी 16 संभाव्य उमेदवारांची यादी 


शिवडी - बाळा नांदगावकर
भायखळा - संजय नाईक
वरळी - संदीप देशपांडे
माहीम - नितीन सरदेसाई
चेंबूर - माऊली थोरवे
घाटकोपर पश्चिम - गणेश चुक्कल
विक्रोळी - विश्वजित ढोलम
मुलुंड - सत्यवान दळवी/राजेश चव्हाण
भांडुप - शिरीष सावंत/योगेश सावंत/संदीप जळगावकर/अतिषा माजगावकर
कलिना - संदीप हटगी/संजय तुरडे
चांदिवली - महेंद्र भानुशाली
जोगेश्वरी - शालिनी ठाकरे
दिंडोशी - भास्कर परब
गोरेगाव - वीरेंद्र जाधव
वर्सोवा - संदेश देसाई
मागाठणे - नयन कदम