काटोल : राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीबरोबर शिवसेना सहभागी होईल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी व्यक्त केला आहे. भाजप सत्तेमध्ये कोणालाच नको आहे, अगदी शिवसेनेलासुद्धा, त्यामुळे निवडणूक निकालात कल हा राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या बाजूने लागेल, असा विश्वास अनिल देशमुख यांनी व्यक्त केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात सत्ता राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी स्थापन करेल. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी मग शिवसेनाही सत्तेत सहभागी होईल, असं अनिल देशमुख यांना वाटत आहे.


अनिल देशमुख हे काटोल नरखेड मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत. तर भाजपकडून चरणसिंह ठाकूर रिंगणात उतरले आहेत. २०१४ साली काटोलमधून आशिष देशमुख निवडून आले होते, पण २०१८ मध्ये त्यांनी आमदारकीचा आणि भाजपचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २०१४ च्या निवडणुकीत आशिष देशमुख यांनी अनिल देशमुख यांचा पराभव केला होता.