बारामतीत जय अजित पवार रंगले प्रचाराच्या रणधुमाळीत
राजकारणात सक्रीय होणार का? असा प्रश्न त्यांना विचारला असता...
बारामती : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे पुत्र जय पवार हे बारामती तालुक्यात प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. बारामती शहरासह तालुक्यातील विविध गावात पदयात्रा काढून ते मतदारांच्या गाठीभेटी घेताना सध्या दिसत आहेत. त्यांच्या पदयात्रांना युवक वर्गाचा चांगलाच प्रतिसाद लाभताना दिसतोय. त्यांना राजकारणात सक्रीय होणार का? असे विचारले असता त्यांनी मी राजकारणात येणार नाही मात्र युवकांचे प्रश्न सोडविण्यासाठी एखादे पद नक्कीच स्वीकारेन, असं त्यांनी म्हटलंय.
लोकसभा निवडणूक २०१९ दरम्यान आपले मोठे बंधु आणि मावळमधून राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्यासाठी 'सोशल मीडिया'ची खिंड लढवताना जय पवार दिसले होते. परंतु, पार्थ पवार यांना मात्र या पहिल्याच निवडणुकीत अपयशाची चव चाखावी लागली.
पवारांच्या तिसऱ्या पीढीतील पार्थ पवार, रोहीत पवार यांच्यानंतर आता जय अजित पवारदेखील राजकारणात चांगलेच ऍक्टिव्ह झालेले दिसत आहेत.