शिरुरचा गड कोण राखणार ?
पुणे जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाचा असणारा शिरूर लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदार संघांचा समावेश
हेमंत चापुडे, झी मिडिया, शिरूर : पुणे जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाचा असणारा शिरूर लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदार संघांचा समावेश होतो. शिरूर लोकसभा मतदार संघात पुणे महानगर पालिकेतील हडपसर तर पिंपरी चिंचवड महानगर पालिकेतील भोसरी आणि ग्रामीण मधील शिरूर आंबेगाव खेड जुन्नर या सहा विधानसभा मतदार संघांचा समावेश होतो. पुणे जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समाजला जातो. याच बालेकिल्ल्यात 2009 च्या झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉग्रेस चे सहापैकी पाच आमदार निवडून आले तर एक जागा ही भाजपाकडे गेली. परंतु त्यानंतर 2014 ला झालेल्या विधानसभा निवडणूकीत सर्वच पक्ष वेगवेगळे लढल्यानंतर राष्ट्रवादी कॉग्रेसला केवळ आंबेगावच्या एका जागेवरती यश मिळाले तर जुन्नरची जागा मनसे ने जिंकली. शिरूरची जागा भाजपकडे गेली. खेड आळंदीच्या जागेवर शिवसेने यश मिळवले. त्यानंतर तर भोसरीची जागा अपक्षाकडे गेली आणि हडपसरच्या जागेवर भाजपने यश मिळवले.
2014 विधानसभा मतदार संघाचा निकाल
जुन्नर विधानसभा मतदार संघातून मनसेचे शरद सोनवणे यांनी विजय मिळवला असून सोनवणे यांनी राष्ट्रवादी कॉग्रेसच्या अतुल बेनके आणि शिवसेनेच्या आशाताई बुचके यांचा पराभव केला..
आंबेगाव विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी कॉग्रेस च्या दिलिप वळसे पाटील यांनी शिवसेनेच्या अरूण गिरे आणि भाजप च्या जयसिंग एरंडे यांचा पराभव केला...
खेड आळंदी विधानसभा मतदार संघातून शिवसेनेच्या सुरेश गोरे यांनी राष्ट्रवादी कॉग्रेस च्या दिलीप मोहिते व भाजप च्या शरद बुटे यांचा पराभव केला..
शिरूर हवेली विधानसभा मतदार संघातून भाजप च्या बाबूराव पाचर्णे यांनी राष्ट्रवादी कॉग्रेस च्या अशोक पवार तर शिवसेनेच्या संजय सातवें यांचा पराभव केला...
या नंतर झालेल्या जिल्हा परिषद निवडणूकांमध्ये राष्ट्रवादी कॉग्रेस ने यश मिळवले परंतू त्या नंतर झालेल्या नगर परिषद निवडणूकीमध्ये जुन्नर चाकण ची नगर परिषद शिवसेनेने जिंकली तर खेड आळंदी ची नगर परिषद भाजपने जिंकली तर शिरूर नगर परिषद राष्ट्रवादी कॉग्रेस सह शिवसेना यांच्या शिरूर विकास आघाडी ने आपल्या कडे मिळवली परंतू त्या नंतर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागांमध्ये राष्ट्रवादी कॉग्रेस ने भरघोस असे यश मिळवले.
तर 2004 पासून शिरूर लोकसभेची जागा हि पंधरा वर्ष शिवसेने च्या ताब्यात होती.परंतू नुकत्याच झालेल्या 2019 च्या लोकसभा निवडणूकीत राष्ट्रवादी कॉग्रेस चे डॉक्टर अमोल कोल्हे यांनी शिवसेनेचे पंधरा वर्ष खासदार असलेल्या शिवाजी आढळराव पाटील यांचा पराभव करत शिरूर चा गड आपल्या कडे मिळवला.
पक्ष निहाय मते
जुन्नर विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी कॉग्रेसच्या अमोल कोल्हेंना 41551 मतांची आघाडी.
आंबेगाव विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी कॉग्रेसच्या अमोल कोल्हेंना 25698 मतांची आघाडी.
खेड आळंदी विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी कॉग्रेसच्या अमोल कोल्हें ना 7446 मतांची आघाडी.
शिरूर हवेली विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी कॉग्रेसच्या अमोल कोल्हे यांना 26305 मतांची आघाडी.
भोसरी विधानसभा मतदार संघातून शिवसेनेच्या शिवाजी आढळराव पाटील यांना 37077 मतांची आघाडी..
हडपसर विधानसभा मतदार संघातून शिवसेनेच्या शिवाजी आढळराव पाटील यांना 5370 मतांची आघाडी..
सहा विधानसभा मतदार संघातून एकूण मिळालेली मते...
राष्ट्रवादी कॉग्रेस डॉ. अमोल कोल्हे : 635830
शिवसेना: शिवाजी आढळराव : 577347
वंचित बहूजन आघाडी : 38070
राष्ट्रवादी कॉग्रेसचे डॉक्टर अमोल कोल्हे यांचा 58483 मतांनी विजय
लोकसभा निवडणूकीतील विजया नंतर मतदार संघातील सर्वच्या सर्व जागा जिंकण्याचा आमचा प्रयत्न असेल असे राष्ट्रवादी कॉग्रेसला वाटतंय..
तर दुसरी कडे 2019 च्या लोकसभा निवडणूकांचा देशातील निकाल पाहिला तर शिवसेना भाजपाचेच सर्वाधिक आमदार निवडून येतील असे शिवसेनेला वाटतंय.
जुन्नर विधानसभा मतदार संघात मनसे मधून शिवसेनेत आलेले शरद सोनवणे व राष्ट्रवादी कॉग्रेस चे अतूल बेनके तसेच शिवसेनेतून हकालपट्टी झालेल्या आशाताई बुचके हि निवडणूक रिंगनात असतील तर कॉग्रेसकडूनही या मतदार संघावरती आपला दावा केला असून सत्यशील शेरकरांना निवडणूकीच्या रिंगनात उतरवलं जाणार असून यांच्यात लढत रंगेल असचं चित्र सध्या तरी आहे,तर आंबेगाव मध्ये लोकसभा निवडणूकीतील पराभवा नंतर शिवाजी आढळराव पाटील या पराभवाचा बदला घेण्यासाठी स्व:ता निवडणूकीच्या रिंगनात उतरण्याची शक्यता असून राष्ट्रवादी कॉग्रेसकडून गेली 6 विधानसभा आमदार असलेले दिलीप वळसे पाटील यांनाच निवडून रिंगणात उतरवलं जाईल...
तर तिकडे खेड आळंदी विधानसभा मतदार संघात शिवसेनेकडून विद्यमान आमदार सुरेश गोरे यांना उमेदवारी मिळेल. राष्ट्रवादी कॉग्रेसकडून माजी आमदार दिलीप मोहिते किंवा शिवसेनेतून राष्ट्रवादीत आलेले रामदास ठाकुर या दोघांपैकी एकाला संधी मिळेल तर भाजपकडून नही खेड आळंदी विधानसभा मतदार संघात गेली पाच वर्षात पक्षाची वाढलेली ताकद पाहता ही जागा आपल्या कडे मिळवून अतुल देशमुख यांना उमेव्दारी देण्याचा प्रयत्न असेल तर तिकडे शिरूर हवेली विधानसभा मतदार संघात भाजप कडून विद्यमान आमदार बाबूराव पाचर्णे यांनांचा पुन्हा निवडून रिंगनात उतरवलं जाईल तर राष्ट्रवादी कॉग्रेस कडून माजी आमदार अशोक पवार यांना पुन्हा एकदा निवडणूकीच्या रिंगणात उतरवलं जावू शकतं...
मतदार संघामधील महत्वाच्या समस्या
१) पुणे नगर महामार्गावरील वाघोली शिक्रापूर येथील वाहतूक कोंडी
२)मतदार संघात पंचतारांकीत एमआयडीसी असून स्थानिक तरूणांना रोजगार नाही.
३) पुणे नाशिक महामार्गावरील चाकण राजगुरूनगर येथील वाहतूक कोंडी
४) रखडलेली सातगाव पठार, म्हाळसाकांत, थिटेवाडी पाणी योजना..
५) रस्त्यांची झालेली दुरावस्था...
६) मोठ्या शहरांतील कचऱ्याची समस्या...
सर्व पक्ष कितीही जागा मिळवण्याचा दावा करत असले तरी जाणकारांच्या मते नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीतील यशा नंतर राष्ट्रवादी कॉग्रेस ची या मतदार संघात पुन्हा ताकद वाढली असून येत्या विधानसभा निवडणूकीतील राष्ट्रवादी कॉग्रेस ला तीन ते चार जागा मिळतील असे राजकीय विश्लेषकांना वाटतंय.या सर्व घडामोठी पाहता कुठल्या पक्षाला किती जागा मिळतात हे येत्या निववडणूकीतं पाहणं महत्वाचं असणार आहे.