आशीष अम्बाडे, झी मीडिया, गडचिरोली : रोपवाटिकेत करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कामकाजाच्या वेळेत मद्य प्राशन केले आणि झोपी गेले. गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यातील मोहगाव रोपवाटिकेत हा धक्कादाय प्रकार घडला आहे. या रोपवाटिकेत दारूपार्ट्या सतत सुरू असल्याची तक्रार होती.  प्रत्यक्ष कार्यालयीन वेळेत मद्यधुंद कर्मचाऱ्यांना राहिले नाही. दोन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 


नेमका काय प्रकार घडला?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यातील बेडगाव वनपरिक्षेत्रातील मोहगाव रोपवाटिकेत कर्मचारी कामकाजाच्या वेळेत झिंगले. कार्यालयीन वेळेत रोपवाटिकेत कर्मचाऱ्यांनी दारू ढोसली. या रोपवाटिकेत सतत दारूपार्ट्या सुरू असल्याची तक्रार होती. परिसरातील नागरिकांनी प्रत्यक्ष कार्यालयीन वेळेत रोपवाटिका गाठली असता मद्यधुंद कर्मचाऱ्यांना कुठलेही भान राहिले नाही. वनविभागाने वायरल व्हिडीओच्या आधारे वनरक्षक वाघाडे व राऊंड ऑफिसर गहाणे या दोघांना निलंबित केले आहे.


तीन वर्षांपासून मनपाचे पाळणाघर धुळखात पडून


राज्यातील अभिनव उपक्रम म्हणून सिवूड येथे नवी मुंबई मनपातर्फे उभारण्यात आलेले पाळणाघर तीन वर्षापासून धुळखात पडले आहे. सर्व सोयी सुविधानी तयार असताना देखील नवी मुंबई मनपाच्या भोंगळ कारभारामुळे अद्याप हे पाळणाघर सुरु होऊ शकले नाही. याविरोधात आता मनसे आक्रमक झाली असून त्यांनी मनपाच्या उपायुक्तांसोबत पाळणाघराची पाहणी केलेय. यावेळी 3 वर्ष धुळखात पडल्यामुळे पाळणाघराची झालेली दुरावस्था पाहता पुन्हा डागडुजी करुन पाळणाघर सुरु करण्याची मागणी मनसेतर्फे करण्यात आली.


नालेसफाई न केल्याने या नागरिकांच्या घरात कंबर एवढे पाणी शिरले


जळगाव शहरातील तांबापुरा पंचशिलनगरात गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे शेकडो कुटुंबांचा संसार उघड्यावर आला आहे. सर्व जणांचे हातावर पोट होते. रहिवाशांचे दुःख पाहता, महापालिकेने घरपट्टी व पाणीपट्टीचा कर माफ करावा, अशी मागणी रहिवाशांनी मनपा आयुक्तांकडे केली. नालेसफाई न केल्याने या नागरिकांच्या घरात कंबर एवढे पाणी शिरले होते त्यात प्रचंड नुकसान या नागरिकांचे झाले होते.
जळगाव शहारत काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे जळगाव शहरातील तांबापुरा पंचशिलनगरात नागरिकांच्या घरात पाणी शिरले होते. मनपा तर्फे या भागातील नालेसफाई न केल्याने त्यांना याचा परिणाम भोगावा लागला होता. त्यामुळे आपल्यावर ओढवलेल्या प्रसंगाची महिलांनी आयुक्तांना माहिती देण्यासाठी व घरपट्टी सह इतर करात सूट देण्यासाठी महापालिकेवर धडक मोर्चा काढला. 
पावसामुळे घरात पाणी शिरून घरात साठविलेले गहू, तांदूळ, डाळी आदी धान्यांसह संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले. 150 पेक्षा अधिक लोकांचा संसार उघड्यावर आला आहे. रात्री झोपायलाही या लोकांना जागा नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आयुक्तांनी या साऱ्या बाबींचा विचार करून करात सूट द्यावी, अशी मागणी या नागरिकांनी केली आहे.