अंबरनाथ : तालुक्यातील द्वारली गावात ६ शाळकरी मुलांना हत्तीरोगाची लागण झाल्याचा प्रकार समोर आला होता. या मुलांची जे.जे. हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी तपासणी केली.  हत्तीरोग झालेली सगळी मुले द्वारली गावातल्या जिल्हापरिषद शाळेत पहिली आणि दुसरीच्या वर्गात शिकणारी आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या शाळेत नुकत्याच झालेल्या हत्तीरोग संक्रमण पडताळणी सर्वेक्षण शिबिरात या सहा मुलांना हत्तीरोग झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर तातडीनं जे.जे. हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमनं द्वारली गावात धाव घेतली. यावेळी मुलांची तपासणी करून त्यांना उपचारांसंबंधी मार्गदर्शन करण्यात आलं.


मात्र, या मुलांमध्ये हत्तीरोगाची लक्षणे असली, तरी त्यांना हत्तीरोग झाला आहे, असं ठामपणे सांगता येणार नसल्याचं मत यावेळी डॉक्टरांनी नोंदवले आहे. दरम्यान, या रोगाची लक्षणे आढल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.