अहमदनगर : श्रीगोंदा तालुक्यातील भानगाव येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. शेतात शेळी चरण्यास गेली म्हणून एका कुटुंबातील महिलेला विवस्त्र करण्याचा प्रकार समोर आला आहे. यावेळी तिच्या पतीलाही जबर मारहाण करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही घटना १२ सप्टेंबरची असून पोलिसांनी याप्रकरणी तीन दिवसानंतर गुन्हा दाखल करून घेतला. दोन्ही समाजाकडून एकमेकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे.


मात्र १० दिवस उलटले तरी आरोपी अद्याप मोकाट आहे. या प्रकरणात चार आरोपी आहेत. संतोष वाघस्कर, जयसिंग वाघस्कर, मनोहर वाघस्कर, कुटे अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींना अजून अटक न केल्याने संताप व्यक्त होत आहे.