धक्कादायक, घरात घुसून तरुणीवर तलवारीने प्राणघातक हल्ला
![धक्कादायक, घरात घुसून तरुणीवर तलवारीने प्राणघातक हल्ला धक्कादायक, घरात घुसून तरुणीवर तलवारीने प्राणघातक हल्ला](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_500x286/public/2018/10/19/306704-acttack.jpg?itok=pmjznrBR)
धक्कादायक बातमी. घरात घुसून तरुणीवर तलवारीने प्राणघातक हल्ला.
नागपूर : राज्यातील तरूणींवर हल्ल्याची मालिका सुरूच आहेत. लातूरपाठोपाठ आता नागपुरात घरात घुसून तरूणीवर तलवारीने प्राणघातक हल्ला करण्यात आला. प्रेमप्रकरणातून हल्ला झाल्याचा संशय आहे. तरूणीची प्रकृती चिंताजनक आहे.
प्रेम प्रकरणांमधून तरुणींवर हल्ले वाढतच चालले आहेत. लातूरपाठोपाठ आता नागपूरमध्येही एका तरुणानं घरात घुसून तरुणीवर प्राणघातक हल्ला केलाय. तरूणीवर तलावरीनं वार केले आहेत. शहरातल्या तुकडोजी नगरमध्ये शुभम मरस्कोल्हे या तरुणानं प्रेम प्रकरणातून हा हल्ला केल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. तरुणीची प्रकृती चिंताजनक असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. आरोपी शुभमला पोलिसांनी ताब्यात घेतलंय.
तीन दिवसांपूर्वी लातूरध्येही अपूर्वा यादव या तरुणीची प्रियकराच्या मित्रानंच घरात घुसून हत्या केली होती. प्रेमात फसवणूक झाल्यानं प्रियकराला आत्महत्या करावी लागली होती म्हणून त्याच्या मित्रानं सुडाच्या भावनेनं अपूर्वाची हत्या केल्याचं उघड झालं. आता नागपूरमध्येही प्रेम प्रकरणातून हत्येचा प्रयत्न झाल्यामुळे राज्यात तरुणींवरील वाढत्या हल्ल्यांचा मुद्दा ऐरणीवर आलाय.