उल्हासनगर : उल्हासनगरचे भाजप आमदार कुमार आयलानी यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. शनिवारी रात्री घडलेला हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला. कुमार आयलानी यांच्या मर्सिडीज गाडीचं यामध्ये नुकसान झालंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आमदार कुमार आयलानी यांचा मुलगा धीरज आयलानी हा शनिवारी रात्री त्यांची मर्सिडीज गाडी घेऊन उल्हासनगर महापालिकेच्या मागच्या बाजूला उभा होता. यावेळी अचानक एका तरुणाने दगड उचलून त्यांच्या मर्सिडीज गाडीवर हल्ला केला. यात धीरज आयलानी हे थोडक्यात बचावले असले, मात्र गाडीचं मात्र नुकसान झालं. 


घटनेची माहिती मिळताच मध्यवर्ती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गुन्हा दाखल केला आहे. हा हल्ला नेमका कुणी आणि का केला? याचा तपास आता मध्यवर्ती पोलीस करत आहेत.