अहमदनगरमध्ये शेतकरी आंदोलनात बस पेटवण्याचा प्रयत्न
पारनेर तालुक्यातील वडनेर येथील पारनेर आगाराची एसटी बस पेटवण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला आहे. वडनेर येथील काही लोकांनी एसटी पेटवून देऊन आंदोलनाला हिंसक वळण देण्याचा प्रयत्न केला.
अहमदनगर : पारनेर तालुक्यातील वडनेर येथील पारनेर आगाराची एसटी बस पेटवण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला आहे. वडनेर येथील काही लोकांनी एसटी पेटवून देऊन आंदोलनाला हिंसक वळण देण्याचा प्रयत्न केला.
विशेष म्हणजे या एसटी बसमध्ये वाहक आणि चालक असतांना लोकांनी पेटती मशाल गाडीत टाकली. मात्र काही लोकांनी आरडाओरडा करून वाहक आणि चालकाला जागे केले आणि त्यांना बाहेर काढण्यास मदत केली त्यामुळे अनर्थ टळला. एसटी बसचं यामध्ये नुकसान झालं आहे.
शेतकऱ्यांचा संपाचा आजचा सहावा दिवस आहे. संपाचं केंद्र बनलेल्या नाशकातल्या कृषीउत्पन्न बाजार समितीत भाजीपाला मार्केटमध्ये माल आलेलाच नाही. त्यामुळे शहरात मोठ्याप्रमाणात भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. दरम्यान शहरातला दुधपुरवठा मात्र सुरळीत सुरू आहे. नाशिकमध्ये आज शेतकरी संपासाठी तयार करण्यात आलेल्या सुकाणू समितीची बैठक होणार आहे.