अंबरनाथ : अंबरनाथ रेल्वे स्थानकावरील एटीव्हीएम मशीनची एका समाजकंटकाने तोडफोड केल्याचा प्रकार समोर आलाय. काल रात्री १२ वाजण्याच्या सुमाराला हा प्रकार घडलाय. मात्र हा सर्व प्रकार रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्हीत कैद झालाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंबरनाथच्या फलाट क्रमांक ३ वर हे एटीव्हीएम आहे. १२ वाजता तिथे एक समाजकंटक आला त्याने एटीव्हीएमची काच फोडली आणि तो पळून गेला. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय.  


काही दिवसांपूर्वीच अंबरनाथमध्ये एका पोलिसावर जीवघेणा हल्ला झाला होता. त्यामुळे रेल्वे पोलीस नेमके करतायत काय असा प्रश्न पडलाय.