Ajit Pawar on  Aaditya Thackeray : बॉलिवूडमधील अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत सनसनाटी आरोप केला होता. ( Maharashtra Politics) त्यानंतर महाराष्ट्राच्या नागपूर हिवाळी अधिवेशनातही हा मुद्दा सत्ताधारांनी उचलून धरला. A U या नावाने रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) हिला 44 कॉल करण्यात आले होते, असे सत्ताधाऱ्यांचे म्हणणे होते. (Maharashtra Political News) शिंदे गट आणि  भाजपच्या आमदारांकडून  A U म्हणजे आदित्य ठाकरे यांचे नाव घेतले जात होते. मात्र, आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी A U हे कोणाचे नाव होते, याची माहिती दिली. त्यामुळे सत्ताधाऱ्यांकडून खोटा आरोप करुन दिशाभूल करण्याचे राजकारण सुरु असल्याचे विरोधी पक्षाचे म्हणणे आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, शिंदे सरकारमधील आमदारांनी काल काय घोषणा दिल्यात? A U म्हणजे कोण? A U हे रिया चक्रवर्ती हिने सांगितले आहे. A U म्हणजे अनया उदास. रिया चक्रवर्तीने सांगितले आहे अनया उदास. असं स्पष्टपणे तिने सांगितले आहे की ती माझी मैत्रिण आहे. म्हणजे कुठलं, कुठं काय करतील. आणि कारण नसताना समाजामध्ये गैरसमज आणि संभ्रम निर्माण करायचा. लोकांमध्ये शंका निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. याची किव करावीशी वाटते. ठिक आहे. तुमचं सरकार आहे. तुम्ही थटा मांडली आहेत. आजही ती रिया चक्रवर्ती सांगत आहे की A U म्हणजे अनया उदास. उगाच आदित्य ठाकरे यांना बदनाम करण्यात येत आहे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे, असे अजितदादा म्हणाले.


ठाकरे गटाकडून आरोप फेटाळले


सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात याआधीही आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करण्यात आले होते. सीबीआयकडून या प्रकरणाचा तपास करण्यात आला. मात्र, त्यात काहीही निष्पण झालेले नाही. आता पुन्हा एकदा राहुल शेवाळे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केल्याने या प्रकरणाला वेगळं वळण लागले. दरम्यान, शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी शेवाळे यांनी केलेले आरोप फेटाळले आहेत. राहुल शेवाळे यांनी पुरावे असतील तर सादर करावेत, असे थेट आव्हान मनिषा कायंदे यांनी दिले आहे. 


दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनीही आदित्य ठाकरे यांच्यावरील आरोप फेटाळून लावले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घोटाळा लपविण्यासाठी हे आरोप करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. दिशाभूल करुन मुख्यमंत्र्यांवरील आरोपाचा मुद्दा बाजुला करण्याचा प्रकार आहे. तर खुद्द आदित्य ठाकरे यांनीही 32 वर्षांच्या तरुणाला हे सरकार घाबरत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे असे चुकीचे आरोप करण्यात येत असल्याचे म्हटले.


शिंदे गटाचे राहुल शेवाळे यांचा गंभीर आरोप


रिया चक्रवर्ती हिच्यावर एनसीबीने ड्रग्ससंबंधी आरोप केला होता. सुशांत सिंगच्या मृत्यूपूर्वी रिया चक्रवर्तीच्या मोबाईलवर जे कॉल आले होते, त्या कॉलच्या संदर्भातला उल्लेख बिहार पोलिसांच्या इन्व्हेस्टिगेशन रिपोर्टमध्ये निदर्शनास आले आहेत. ते कॉल A U या नावाने आले आहेत. रिया चक्रवर्तीची जी लिगल टीम आहे त्यांनी A U चा अर्थ अन्यन्या उद्धव असा सांगितला. पण मुंबई पोलिसांनी याबाबत कोणताही खुलासा केला नाही.