मुंबई: राज्यात झपाट्यानं कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. दुसरीकडे लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात वाढवण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाची आणि धक्कादायक बातमी औरंगाबादमधून समोर येत आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतल्यानंतर ही आतापर्यंत औरंगाबादमध्ये 21 जण पॉझिटिव्ह आले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शहरात कोरोना संसर्गाचा उद्रेक झाला आहे आणि त्यातून आता लसीकरण झाल्यानंतर ही बाधा होत आहे. पहिला डोस घेतल्यानंतर ही सगळी लोक पॉझिटिव्ह आल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र त्यांना फारशी लक्षणे नाहीत.


 पहिला डोस झाल्यानंतर काळजी घेण्याची तितकीच गरज आहे असे प्रशासनाने सांगितलं आहे. दुसरीकडे लोकांच्या निष्काळजीपणामुळे हा धक्कादायक प्रकार होत असल्याचं पाहायला मिळत आहे. 


औरंगाबादेत आजपासून दोन दिवस कडक लॉक डाऊन आहे. औरंगाबाद शहरात अंशतः लोक डाऊन प्रशासनाने लावला आहे त्याचाच भाग म्हणून शनिवार आणि रविवार कडक लोक डाऊन करण्यात आलेला आहे. 


नागरिकांनी विनाकारण घराबाहेर फिरू नये अशा पद्धतीच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आलेले आहेत. जीवनावश्यक वस्तूंची दुकानं मर्यादित वेळासाठी उघडे राहतील मात्र इतर सगळे सेवा बंद असेल शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे शनिवारी सुद्धा शहरात सहाशे वर रुग्ण सापडले या सर्व परिस्थितीत आणखी काही निर्बंध लागण्याचीही शक्यता आहे.


दरम्यान शनिवारी रविवारी विकेंड लॉक डाउन ला नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे,  प्रशासनाच्या कामात  कुणी व्यत्यय आणल्यास गुन्हा दाखल करणार अशा पद्धतीचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.