मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या जबरदस्त वेगाने वाढत आहे.  या वेगावर नियंत्रण घालण्याचे आवाहन प्रशासनासमोर आहे. औरंगाबादेतही कोरोना रुग्ण संख्येचा विस्फोट झाला असून, खुद्द जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी  चिंता व्यक्त केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्य़ेने सध्या जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढवली आहे. कोरोनाचा संसर्ग इतक्या झपाट्याने पसरतोय की, त्याच्या वेगावर नियंत्रण आणणं कठीण झालं आहे.


 सध्या औरंगाबादमध्ये 100 जणांमागे 25 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहेत. कोरोनाचा हा विस्फोट चिंताजनक आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनासमोरील आव्हान वाढले  आहे. 
 
 कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे भीती वाढली असल्याचे खुद्द जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी सांगितले आहे. 
 
 नागरिकांनी कोरोना नियमांचं गांभिर्याने पालन करावं, आवश्यकता असेल  तरच घराबाहेर पडावं, गर्दी टाळावी असं आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे.