औरंगाबाद कचऱ्याचा प्रश्न भिजत घोंगडे
औरंगाबाद: शहरात कचरा प्रश्न सुरु होऊन ८ महिने झालेत. मात्र अजूनही कचऱ्याचा प्रश्न सुटलेला नाही.
औरंगाबाद : शहरात कचरा प्रश्न सुरु होऊन ८ महिने झालेत. मात्र अजूनही कचऱ्याचा प्रश्न सुटलेला नाही. औरंगाबाद महापालिकेनं कचऱ्याच्या प्रक्रियेसाठी ४ जागा अंतिम केल्या होत्या. मात्र त्यापैकी एकाही जागेवर अजूनही प्रक्रिया सुरु झालेली नाही. फक्त पायाभूत सुविधा निर्माण करण्याचंच काम अजूनही सुरु आहे.
बुधवारी मुख्यमंत्र्यांनी सुद्धा याबाबत बैठक घेत आढावा घेतला आणि तातडीनं काम पूर्ण करायचे निर्देश दिले. अजूनही शहराच्या बाहेर मिळेल तिथं कचरा फेकण्याचं, कचऱ्याला आग लावण्याचं काम, महापालिकेकडून छुप्या पद्धतीनं सुरु असल्याचं दिसतंय. या सगळ्या पार्श्वभूमीवर अजूनही पायाभूत सुविधा निर्माण करण्याचं काम सुरु असल्याचं महापौर सांगताहेत.
मात्र नक्की प्रश्न कधी सुटणार याची तारीख सांगत नाही. उलट स्वच्छतेत पहिल्या क्रमांकावर असलेल्या इंदोरपेक्षा शहर स्वच्छ करणार असं सांगून ते वेळ मारुन नेताहेत.